मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्समध्ये आणखी वाढ असूनही बुधवारी ( दि. ९ ) कमी व्यवहार झाले. सलग बारा आठवडे नकारात्मक परतावा अनुभवल्यानंतर, तिसऱ्या आठवड्यातही क्रिप्टो व्यापारी अजूनही जोखीम न घेण्याच्या मोडमध्ये आहेत. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यातच आज ०.४१ टक्क्यांनी बिटकॉइनच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
आजचा बिटकॉइनचा दर
आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ३० हजार २३४ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात २३ लाख ५५ हजार ०३० रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर
आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ७९६ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ८३ हजार १०२ रुपये इतका आहे.
आजचा डोज कॉईनचा दर
आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०८० डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ६.१८ रुपये इतका आहे.