मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्समध्ये आणखी वाढ असूनही शनिवारी ( दि. ११ ) कमी व्यवहार झाले. सलग बारा आठवडे नकारात्मक परतावा अनुभवल्यानंतर, चौथ्या आठवड्यातही क्रिप्टो व्यापारी अजूनही जोखीम न घेण्याच्या मोडमध्ये आहेत. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत.
आजचा बिटकॉइनचा दर
आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २८ हजार २५९ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात २२ लाख १५ हजार ५१६ रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर
आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ५०४ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ७२ हजार ४६८ रुपये इतका आहे.
आजचा डोज कॉईनचा दर
आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६९ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ५.४० रुपये इतका आहे.