ETV Bharat / bharat

Selfie Point in Kedarnath: केदारनाथ मंदिराजवळ अभिनेता सुशांत सिंगची आठवण जपण्याकरिता होणार सेल्फी पाँईट, काँग्रेसचा विरोध

author img

By

Published : May 24, 2022, 6:13 PM IST

उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज ( satapal maharaj advocates for selfie point ) म्हणाले की, राज्याच्या पर्यटन विभागाला या मुद्द्यावर योजना तयार करण्यास सांगितले आहे. राजपूत यांनी त्या ठिकाणी चांगला चित्रपट बनविल्यानंतर मी केदारनाथमध्ये सेल्फी पॉइंट बनवण्याचा ( selfie point in kedarnath ) विचार केला आहे. त्यांचे चित्र येथे लावून त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे, असे मंत्र्यांनी माध्यमांना सांगितले.

केदारनाथ मंदिर
केदारनाथ मंदिर

डेहराडून - उत्तराखंड सरकारने सोमवारी केदारनाथ चित्रपटाचा मुख्य अभिनेता दिवंगत सुशांत सिंह राजपूत याच्या नावाने सेल्फी पॉइंट तयार करण्याची ( sushant rajput selfie point in kedarnath ) कल्पना मांडली आहे. या कल्पनेला काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. दिवंगत अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये आणि केदारनाथला भेट देणार्‍या पर्यटकांमध्ये त्यांची छायाचित्रे केदारनाथमध्ये या ठिकाणी घेता ( congress objects selfie point in kedarnath ) येतील, असे सरकारने म्हटले आहे. परंतु धार्मिक स्थळी सेल्फी पॉईँट बनविणे योग्य नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज ( satapal maharaj advocates for selfie point ) म्हणाले की, राज्याच्या पर्यटन विभागाला या मुद्द्यावर योजना तयार करण्यास सांगितले आहे. राजपूत यांनी त्या ठिकाणी चांगला चित्रपट बनविल्यानंतर मी केदारनाथमध्ये सेल्फी पॉइंट बनवण्याचा ( selfie point in kedarnath ) विचार केला आहे. त्यांचे चित्र येथे लावून त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे, असे मंत्र्यांनी माध्यमांना सांगितले. त्यांनी बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांना उत्तराखंडमध्ये चित्रपट बनवण्याच्या संधी शोधण्यासाठी आमंत्रित करण्यास सांगितले आहे. कारण यामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल.

केदारनाथ सिनेमात सुशांत सिंह राजपूतने साकारली भूमिका-केदारनाथमध्ये 2013 च्या महापूरानंतर, 2018 मध्ये राजपूत आणि सोहा अली खान यांनी केदारनाथ सिनेमा बनविला होता. केदारनाथ आणि जवळपासच्या भागात त्याचे मोठ्या प्रमाणावर शूटिंग करण्यात आले होते. या चित्रपटात राजपूतने पर्यटकांना मदत करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. पाठीवर बांधलेल्या खुर्चीवर (पालखी) भाविकांना मंदिरात घेऊन जात असल्याचे सिनेमात दाखविले होते. काँग्रेसचे सरचिटणीस आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी धार्मिक स्थळी मानवाचे स्मारक बांधण्याचा मंत्र्यांचा प्रस्ताव अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

पर्यटनाच्या अनंत संधी आहेत-हरीश रावत म्हणाले, की भगवान शिवाचे निवासस्थान असलेल्या केदारनाथसारख्या ठिकाणी मानवी स्मारक होण्यामागे काय अर्थ आहे? भगवान केदार आणि भगवान बद्रीनाथ यांचे वास्तव्य असलेले स्थान निर्माण करून तुम्हाला काय करायचे आहे? मी माझ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केदारनाथचा अभ्यास केला. मला तेथे पर्यटनाच्या अनंत संधी दिसल्या आहेत. पण सखोल चिंतन केल्यावर मला जाणवले की ते एक अध्यात्मिक ठिकाण आहे. तेथील परंपरांसोबत छेडछाड करणे योग्य नाही.

हेही वाचा-Kerala Dowry Case : विसम्या प्रकरणात पतीला 10 वर्षांचा तुरुंगवास

हेही वाचा-Students One Day MLA in Gujarat : गुजरातमध्ये 182 'नायक'; विद्यार्थी चालवणार विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन

हेही वाचा-Nautpa begins in Chhattisgarh :छत्तीसगडमध्ये 25 मेपासून नौताप सुरू, शास्त्रीय आधार नसल्याचा हवामान विभागाचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.