जयपूर - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने बंदुकीच्या गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना राजस्थानमधील भिलवारा जिल्ह्यात घडली आहे.
बी. रणजीत यांची सीआयएसएफच्या ९व्या केंद्रीय राखीव दलात नियुक्ती होती, अशी माहिती हनुमान नगर पोलीस स्टेशनचे एसएचओ मोहम्मद इम्रान यांनी दिली. मृत जवान मूळचे तामिळनाडूमधील रविहासी होते. त्यांचा २१ फेब्रुवारीला विवाह होणार होता. त्यांच्या पार्थिवाजवळ आत्महत्येबाबतची कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. त्यांच्या आत्महत्येबाबतची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे. देवळी रुग्णालयात जवानाचे पार्थिव ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जवानाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.
दरम्यान, बंदुकीच्या गोळ्या झाडून जवानाने आत्महत्या केल्याचा घटना यापूर्वीही घडल्या आहेत.