ETV Bharat / bharat

चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांची केली पक्षातून हकालपट्टी

author img

By

Published : Jun 15, 2021, 8:08 PM IST

राग पासवान यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन पाचही खासदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाविरोधात काम केल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे.

Chirag Paswan latest news
चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांची केली हकालपट्टी

पाटना - एकीकडे लोकजनशक्ती पार्टीच्या 6 पैकी 5 खासदारांनी पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून पशूपती कुमार यांची नेतेपदी निवड केली. तसेच चिराग पासवान यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरूनही हटवण्यात आले. तर दुसरीकडे चिराग पासवान यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन पाचही खासदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाविरोधात काम केल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. दरम्यान, चिराग पासवान यांच्या जागी सूरजभान यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच पाच दिवसांच्या आत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावून नव्या अध्यक्षाची निवड केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते.

चिराग पासवान यांनी ट्वीट करून व्यक्त केल्या भावना -

चिराग पासवान यांनी ट्वीट करून यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. 'वडिलांनी बनवलेला हा पक्ष आणि आपले कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी मी प्रयत्न केले. मात्र, अयशस्वी ठरलो. पक्ष आई समान आहे. आईला धोका द्यायला नको. लोकाशाहीत जनताच सर्वकाही आहे. पक्षावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मी धन्यवाद देतो. एक जुने पत्र सार्वजनिक करतो आहे, असे चिराग यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Chirag Paswan latest news
चिराग पासवान यांचे ट्वीट

कोण आहे पशूपती पारस -

पशूपतीकुमार पारस हे चिराग पासवान यांचे वडील आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू आहेत. तसेच हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. दरम्यान, 'मी पक्षात फूट पाडली नाही, पक्ष वाचवला आहे. चिराग पासवानच्या नेतृत्वावर ९९ टक्के कार्यकर्ते नाराज होते. बिहारमध्ये २०२० च्या विधानसभा निवडणुकीतील प्रदर्शनामुळेही संभ्रम निर्माण झाला होता. जेडीयूविरोधात लढणे महागात पडले’, अशी प्रतिक्रिया पशूपती पारस यांनी दिली.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट, हप्ता वसुली करणारा 'तो' पोलीस कर्मचारी अखेर निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.