नोम पेन्ह (कंबोडिया) : थायलंडच्या सीमेवर असलेल्या कंबोडियातील हॉटेल कॅसिनोला लागलेल्या ( Cambodia Hotel Fire ) आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. कंबोडियन पोलिसांच्या अंतिम अहवालानुसार बुधवारी रात्री 11:30 वाजता पॉईपेट येथील ग्रँड डायमंड सिटी हॉटेल-कॅसिनोमध्ये आग ( Grand Diamond City Hotel Fire) लागली, ज्यात सुमारे 10 लोकांचा मृत्यू झाला आणि 30 जण जखमी झाले. ( Cambodia Hotel Fire Ten People killed )

जळत्या इमारतीवरून उडी : ऑनलाइन शेअर केलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये कंपाऊंडला प्रचंड आग ( fire in the compound ) लागल्याचे दाखवण्यात आले आहे, काही क्लिपमध्ये लोक जळत्या इमारतीवरून उडी मारताना दिसत आहेत. आग लागली तेव्हा कॅसिनोमध्ये परदेशी नागरिक उपस्थित होते, अशी माहिती आहे. जखमींना थायलंडच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हॉटेलमध्ये 50 लोक अडकल्याची भीती : स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, इमारतीत अजूनही सुमारे 50 लोक अडकल्याची भीती आहे.( Hotel Casino Fire ) आपत्कालीन विभागाच्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 53 जणांची सुटका करण्यात आली आहे. हॉटेल आणि कॅसिनो कॉम्प्लेक्समध्ये सुमारे सहा तास लागलेली आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. त्याचवेळी, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओंमध्ये हॉटेलचा मोठा भाग अजूनही जळताना दिसत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थायलंडमधून आपत्कालीन कर्मचारी आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.