ETV Bharat / bharat

Blast at Brick Factory: मोतिहारीमध्ये मोठी दुर्घटना: वीटभट्टीची चिमणी फुटल्याने स्फोट, 5 जणांचा मृत्यू..अनेक गाडले

author img

By

Published : Dec 23, 2022, 7:46 PM IST

Blast at Brick Factory: मोतिहारी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. वीटभट्टीच्या चिमणीला आग लागल्याने स्फोट झाला. ज्यामध्ये आतापर्यंत ५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. चिमणीत अनेक मजूर गाडले गेले आहेत. ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.

BLAST AT BRICK FACTORY IN MOTIHARI OF BIHAR
मोतिहारीमध्ये मोठी दुर्घटना: वीटभट्टीची चिमणी फुटल्याने स्फोट, 5 जणांचा मृत्यू..अनेक गाडले

पूर्व चंपारण (बिहार): Blast at Brick Factory: बिहारमधील मोतिहारी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. वीटभट्टीच्या चिमणीला आग लागल्याने मोतिहारी येथील वीट कारखान्यात स्फोट झाला. ज्यामध्ये आतापर्यंत ५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. चिमणीत अनेक मजूर गाडले गेले आहेत. त्यांना हटवण्याचे काम सुरू आहे.

रामगढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. नागरगिरमध्ये वीटभट्टीची चिमणी कोसळल्याने अनेक मजूर गाडले गेले. पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच 15 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. ज्यांना जखमी अवस्थेत रक्सौल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही अनेक लोक दबले जाण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. ज्यामध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक पोलिस आणि अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.