नवी दिल्ली - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज 131 वा वाढदिवस आहे. पंडित नेहरू मुलांमध्ये 'चाचा नेहरू' म्हणून परिचित होते. मुलांविषयीचे त्यांचे विशेष आकर्षण पाहून आज बालदिन साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंना श्रद्धांजली वाहिली. 'देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली, असे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
-
देश के प्रथम प्रधानमंत्री पं. जवाहर लाल नेहरू को उनकी जयंती पर मेरी विनम्र श्रद्धांजलि।
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">देश के प्रथम प्रधानमंत्री पं. जवाहर लाल नेहरू को उनकी जयंती पर मेरी विनम्र श्रद्धांजलि।
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2020देश के प्रथम प्रधानमंत्री पं. जवाहर लाल नेहरू को उनकी जयंती पर मेरी विनम्र श्रद्धांजलि।
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2020
राहुल गांधींनीही वाहिली श्रद्धांजली
देशात पहिल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी होत आहे. महान दूरदर्शी नेहरु यांनी बंधुता, समतावाद आणि आधुनिक दृष्टिकोनाने आपल्या देशाचा पाया रचला. या मूल्यांचे जतन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असे राहुल गांधींनी टि्वटमध्ये म्हटलं.
-
Today, India celebrates the birth anniversary of its first PM Pandit Jawaharlal Nehru ji: a towering visionary who laid the foundation of our country with values of brotherhood, egalitarianism & modern outlook.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Our endeavour must be to conserve these values.
">Today, India celebrates the birth anniversary of its first PM Pandit Jawaharlal Nehru ji: a towering visionary who laid the foundation of our country with values of brotherhood, egalitarianism & modern outlook.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 14, 2020
Our endeavour must be to conserve these values.Today, India celebrates the birth anniversary of its first PM Pandit Jawaharlal Nehru ji: a towering visionary who laid the foundation of our country with values of brotherhood, egalitarianism & modern outlook.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 14, 2020
Our endeavour must be to conserve these values.
बालदिन म्हणून होतो साजरा
1964 पर्यंत बालदिन 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता. परंतु, जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांचा जन्मदिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बर्याच देशांमध्ये 1 जून हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. यूएनच्या घोषणेनुसार काही देश 20 नोव्हेंबरला बालदिन साजरा करतात.
देशाचे थोर नेते
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्रेष्ठ मुत्सद्दी म्हणून पंडीतजींना ओळखले जाते. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली. या घटनेने जवाहरलाल नेहरूंना मोठा धक्का बसला.‘आपल्या जीवनातील प्रकाश हरपला’ असे उद्गार त्यांनी काढले होते. पंतप्रधान म्हणून अठरा वर्षांच्या कारकीर्दीत पंडितजींची लोकप्रियता ओसरली नाही. अंतर्गत व आंतरराष्ट्रीय राजकारणात काही महत्त्वाचे उपक्रम त्यांनी केले. त्यांच्या कारकीर्दीत भारतीय संविधान तयार झाले व संसदीय लोकशाही शासनाची सुरुवात झाली.