ETV Bharat / bharat

दिल्लीत मास्क बनविण्याच्या वादातून तरुणाला भोसकले - masks

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुघलकाबाद क्षेत्रातील एका कारखान्यात दोन गटांत भांडण झाले आणि त्यात सलमान जखमी झाला. त्याला माजिडिया रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Delhi
दिल्लीत मास्क बनविण्याच्या वादातून तरुणाला भोसकले
author img

By

Published : May 5, 2020, 11:49 AM IST

नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीच्या गोविंदपुरी भागात एका १७ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. मास्क बनविण्याच्या वादातून काही ओळखीच्याच लोकांनी या तरुणाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजता घडली.

मृताची ओळख पटविण्यात आली असून त्याचे नाव सलमान आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अफसरला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुघलकाबाद क्षेत्रातील एका कारखान्यात दोन गटांत भांडण झाले आणि त्यात सलमान जखमी झाला. त्याला माजिडिया रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

चौकशीदरम्यान, मृत सलमानचे वडील कमर यांनी पोलिसांना सांगितले की १० रुपये प्रति मास्क या दराने सलमान मुमताजसाठी मास्क बनवत होता. मा्र, गेल्या काही दिवसांपासून मुमताज त्याच्याकडून मास्क घेत नव्हता. सलमानने कारण विचारले असता अख्तर नावाचा व्यक्ती त्याला नऊ रुपयात मास्क देत असल्याचे सांगितले. दरम्यान, तुगलकाबाद येथील रहिवासी असलेला अफसर कारखान्यात पोहोचला. अफसर आणि सलमान यांच्या मास्क बनविण्यावरून जोरदार भांडण झाले, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, अख्तर आणि त्याच्या दोन मुलांनी कारखान्याचा दरवाजा बंद केला आणि सलमान खोलीत अडकला. अचानक अफसरने कात्रीनेसलमानच्या मानेवर दोन-तीन वार केले आणि तो जखमी झाला.

याप्रकरणी गोविंदपुरी पोलीस ठाण्यात अफसर, अख्तर आण गुलाम मोहम्मद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.