ETV Bharat / bharat

जागतिक संस्कृत दिनानिमित्त आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम

जागतिक संस्कृत दिनानिमित्त आज (सोमवारी) आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. ‘बहुजन भाषा-संस्कृत भाषा’ असं या कार्यक्रमाचं नांव असून २० मिनिटांचा हा कार्यक्रम सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी FM 100 अंश 1 वाहिनीवर प्रसारित होणार आहे

जागतिक संस्कृत दिनानिमित्त आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम
जागतिक संस्कृत दिनानिमित्त आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम
author img

By

Published : Aug 3, 2020, 7:11 AM IST

नवी दिल्ली - जागतिक संस्कृत दिनानिमित्त आज (सोमवारी) आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. ‘बहुजन भाषा-संस्कृत भाषा’ असं या कार्यक्रमाचं नांव असून २० मिनिटांचा हा कार्यक्रम सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी FM 100 अंश 1 वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

या कार्यक्रमाचं थेट प्रसारण www.newsonair.com, तसंच आकाशवाणीच्या ट्विटर हँडलवर आणि YouTube चॅनेल वर ऐकता येईल.

संस्कृत दिनानिमित्त प्रसारित होणाऱ्या आजच्या आजच्या बहुजन भाषा संस्कृत भाषा या कार्यक्रमाच्या माध्यमातून या भाषेचे विद्वान संस्कृतचे महत्त्व विशद करतील. तसेच या कार्यक्रमात प्रियमानसम आणि पुण्यकोटी या 2 संस्कृत चित्रपटांवर प्रकाश टाकला जाईल. याशिवाय सूधर्म या संस्कृत वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत प्रसारित केली जाणार आहे.

जागतिक संस्कृत भाषा दिनानिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे संस्कृत मधून एक विशेष संदेश देणार आहेत, त्यामधून ते संस्कृत भाषेचे महत्व विशद करतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.