ETV Bharat / bharat

खरेखूरे कोरोना योद्धे : पती-पत्नी दोघेही बाहेर पडतात, तर मुलं दिवसभर घरामध्ये कोंडलेली

जगभर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जग कोरोनाशी दोन हात करत आहे. भारतातही कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. पोलीस, डॉक्टर आणि सफाई कामगार हे कोरोना योद्धे निकराचा लढा देत आहेत.

Real CORONA warriors
खरेखूरे कोरोना योद्धे: पती पत्नी दोघेही कोरोनाच्या लढाईमध्ये सहभागी तर मुलं दिवसभर घरामध्ये बंद
author img

By

Published : Apr 30, 2020, 5:32 PM IST

चुरू (राजस्थान) - जगभर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जग कोरोनाशी दोन हात करत आहे. भारतातही कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. पोलीस, डॉक्टर आणि सफाई कामगार हे कोरोना योद्धे निकराचा लढा देत आहेत. राजस्थानमधील चुरू येथे एका कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये कार्यरत आहेत. ते दिवसभर कर्तव्यावर असतात आणि त्यांचे पाच-पाच वर्षांची दोन जुळी मुलं घराला कुलूप लावून घरात बसवलेले असतात.

खरेखूरे कोरोना योद्धे: पती पत्नी दोघेही कोरोनाच्या लढाईमध्ये सहभागी तर मुलं दिवसभर घरामध्ये बंद

या दाम्पत्यामधील पती हे राजस्थान पोलिसात कार्यरत आहेत तर पत्नी आरोग्य क्षेत्रात. संजय बसेरा असं पोलीस शिपायाचे नाव आहे. संकटाच्या काळात देशभर पोलीस आणि आरोग्य दोन्ही क्षेत्र महत्त्वाची भूमीका बजावत आहेत. संबंधीत दाम्पत्याला दोन मुलं आहेत. दोघेबी सकाळी घराबाहेर पडताना, घरामध्ये मुलांना बसवून घराला कुलूप लावतात.

संजय बसेरा म्हणाले, की सकाळी 6 वाजता आम्ही दोघे पती पत्नी बाहेर पडतो. पत्नी संदिपा बसेरा ही घरापासून 10 किमी दूर काम करते तर मी सुद्धा खूप वेळ घराबाहेर असतो. दरम्यान, मुलांना मजबुरीने घराला कुलूप लावून आता बसवायला लागतं. आईवडील म्हातारे असल्यामुळे आणि त्यांना कोरोनाचे संक्रमण लवकर होऊ शकते म्हणून, त्यांना गावी पाठवलं आहे. त्यामुळे मुलांजवळ कोणी नसतं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.