नवी दिल्ली - काँग्रेस नेते शशी थरुर यांनी देशात झुंडबळीच्या वाढत्या घटनांवरुन पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारताममध्ये आता सहिष्णुतेला जागा राहिली नाही. देशात राजकारणाचे ध्रुवीकरण झाले आहे. यासाठी सत्ताधारी जबाबदार असल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली. पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
-
Shashi Tharoor: Is this our Bharat? Is this what Hindu Dharam says? I am a Hindu but not of this kind. Also, while killing people, they are asked to say ‘Jai Sri Ram’. It is an insult to Hindu Dharma. It is an insult to Lord Ram that people are being killed using his name. pic.twitter.com/30FyKel2aO
— ANI (@ANI) September 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Shashi Tharoor: Is this our Bharat? Is this what Hindu Dharam says? I am a Hindu but not of this kind. Also, while killing people, they are asked to say ‘Jai Sri Ram’. It is an insult to Hindu Dharma. It is an insult to Lord Ram that people are being killed using his name. pic.twitter.com/30FyKel2aO
— ANI (@ANI) September 22, 2019Shashi Tharoor: Is this our Bharat? Is this what Hindu Dharam says? I am a Hindu but not of this kind. Also, while killing people, they are asked to say ‘Jai Sri Ram’. It is an insult to Hindu Dharma. It is an insult to Lord Ram that people are being killed using his name. pic.twitter.com/30FyKel2aO
— ANI (@ANI) September 22, 2019
सहा वर्षांपूर्वी पुण्यामध्ये मोहसिन खान या युवकाच्या हत्येने देशात झुंडशाहीला सुरुवात झाली. त्यानंतर गोमांस असल्याच्या आरोपावरुन मोहम्मद अखलाखची हत्या करण्यात आली. मात्र, त्याच्याकडे तर गोमांसही नव्हते, तरीही त्याला जमावाने ठार मारले. जरी अखलाखकडे गोमांस असते तरी त्याला मारण्याची परवानगी कोणी दिली, असा सवाल त्यांनी विचारला.
राजस्थानातील पहलू खान याच्याकडे गायी घेवून जाण्याचा परवाना होता. मात्र, तरीही त्याला जमावाने मारून टाकले. निवडणुकांच्या एका निकालामुळे लोकांना अशी कोणती ताकद मिळाली, की ते काहीही करु शकतात, कोणालाही मारु शकतात, असे ते म्हणाले.
भारत देश आणि हिंदु धर्म असे शिकवतो का? जय श्रीरामच्या घोषणा देण्यावरुन मारुन टाकण्यात येते. हा हिंदु धर्माचा अपमान आहे, राम नावाचा वापर करुन लोकांच्या हत्या होतायेत, हा भगवान रामाचा अपमान आहे, असेही थरुर म्हणाले.