दिल्ली - आज मी त्या सर्व वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहतो, ज्यांनी आपल्या रक्ताचे बलिदान देऊन कारगिलच्या शिखरावर तिरंगा फडकवला. तसेच या शूरवीरांना जन्म देणाऱ्या शूर मातांचाही मी आदर करतो. कारगिल विजय म्हणजे आमच्या मुला-मुलींच्या शौर्याचा विजय. हा भारताच्या सामर्थ्याचा आणि संयमाचा विजय होता. हा भारताच्या पावित्र्याचा आणि शिस्तीचा विजय होता. हा प्रत्येक भारतीयांच्या अपेक्षांचा विजय होता, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीमध्ये कारगिल युद्धाला 20 वर्षे पूर्ण झाल्यामुळे 'कारगिल विजय दिवस' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोदी बोलत होते.
-
PM Modi: In last 5 yrs, several imp decisions were taken for welfare of our soldiers&their families. Our govt took decision to implement OROP, which was pending since decades. Right after our govt was formed this time, we took decision to raise scholarship of martyrs' children. pic.twitter.com/yuf46EypHi
— ANI (@ANI) July 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PM Modi: In last 5 yrs, several imp decisions were taken for welfare of our soldiers&their families. Our govt took decision to implement OROP, which was pending since decades. Right after our govt was formed this time, we took decision to raise scholarship of martyrs' children. pic.twitter.com/yuf46EypHi
— ANI (@ANI) July 27, 2019PM Modi: In last 5 yrs, several imp decisions were taken for welfare of our soldiers&their families. Our govt took decision to implement OROP, which was pending since decades. Right after our govt was formed this time, we took decision to raise scholarship of martyrs' children. pic.twitter.com/yuf46EypHi
— ANI (@ANI) July 27, 2019
पुढे बोलताना मोदी म्हणाले, मागील ५ वर्षात आमचे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन (OROP) योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय अनेक दशकांपासून प्रलंबित होता, तो निर्णय सरकाने घेतला आहे. त्याबरोबर वीर जवानांच्या मुलांची शिष्यवृत्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे मोदी यांनी सांगितले.
आता अवकाशदेखील युद्धभूमी होत आहे. त्याशिवाय सायबरयुध्दांचाही काळ आला आहे. त्यामुळे आपल्या बचाव पथकांना अद्ययावत आणि अत्याधुनिक सोयी देणे, ही केवळ गरजच उरली नाही. ती बाब प्राधान्याने केली जाणे गरजेचे आहे आणि आम्ही त्याकडे लक्ष पुरवले आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी कारगिल युद्धामध्ये वीरमरण आलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांचे वडील जी.एल. बत्रा यांची भेट घेतली. कॅप्टन बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले आहे.