ETV Bharat / bharat

झोप पूर्ण न झाल्याने पंतप्रधान मोदींचे मानसिक संतुलन बिघडले आहे - भूपेश बघेल

'मोदी दिवसभरात फक्त ३ ते ४ तासांची झोप घेतात. जे पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. राजीव गांधीजी अनेक वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले. निवडणुका सुरू असताना त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे उद्गार काढणे हे मानसिक संतुलन ढासळल्याचे लक्षण आहे,' असे बघेल पत्रकार परिषदेत म्हणाले.

भूपेश बघेल
author img

By

Published : May 7, 2019, 10:09 AM IST

रायपूर - पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना राजीव गांधी पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी असल्याचे वक्तव्य केले होती. ‘भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला,' असे ते म्हणाले होते. यानंतर मोदींना मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी झोप पूर्ण न झाल्याने पंतप्रधान मोदींचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका केली आहे. त्यांना मानसोपचारांची गरज आहे, असे ते म्हणाले.

'मोदी दिवसभरात फक्त ३ ते ४ तासांची झोप घेतात. जे पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. राजीव गांधीजी अनेक वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले. निवडणुका सुरू असताना त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे उद्गार काढणे हे मानसिक संतुलन ढासळल्याचे लक्षण आहे,' असे बघेल यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

मोदी सध्या उघडपणे बोफोर्स घोटाळ्याविषयी बोलत आहेत. यामध्ये बोफोर्स तोफांच्या स्वीडिश संरक्षण उत्पादकांकडून कराराबदल्यात काही रक्कम मिळाल्याचा आरोप राजीव गांधींवर केला गेला होता. १९९१ ला त्यांची हत्या झाली. या प्रकरणावरून राजीव गांधींचा प्रवास पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी म्हणून संपला, असे वक्तव्य मोदींनी केले होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांविषयी बोलताना देशात संपुआचे सरकार येईल आणि राहुल गांधी पुढील पंतप्रधान बनतील, असे ते म्हणाले. याआधी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, राजद नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधीचे नाव पुढे केले होते.

Intro:Body:

pm modi lost mental balance needs proper sleep medical treatment bhupesh baghel

pm modi, lost mental balance, proper sleep, medical treatment, bhupesh baghel, chhattisgarh cm

--------------

झोप पूर्ण न झाल्याने पंतप्रधान मोदींचे मानसिक संतुलन हरवले आहे - भूपेश बघेल

रायपूर - पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना राजीव गांधी पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी असल्याचे वक्तव्य केले होती. ‘भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला,' असे ते म्हणाले होते. यानंतर मोदींना मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी झोप पूर्ण न झाल्याने पंतप्रधान मोदींचे मानसिक संतुलन हरवले आहे, अशी टीका केली आहे. त्यांना मानसोपचारांची गरज आहे, असे ते म्हणाले.

'मोदी दिवसभरात फक्त ३ ते ४ तासांची झोप घेतात. जे पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. राजीव गांधीजी अनेक वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले. निवडणुका सुरू असताना त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे उद्गार काढणे हे मानसिक संतुलन ढासळल्याचे लक्षण आहे,' असे बघेल यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

मोदी सध्या उघडपणे बोफोर्स घोटाळ्याविषयी बोलत आहेत. यामध्ये बोफोर्स तोफांच्या स्वीडिश संरक्षण उत्पादकांकडून कराराबदल्यात काही रक्कम मिळाल्याचा आरोप राजीव गांधींवर केला गेला होता. १९९१ ला त्यांची हत्या झाली. या प्रकरणावरून राजीव गांधींचा प्रवास पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी म्हणून संपला, असे वक्तव्य मोदींनी केले होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांविषयी बोलताना देशात संपुआचे सरकार येईल आणि राहुल गांधी पुढील पंतप्रधान बनतील, असे ते म्हणाले. याआधी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, राजद नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधीचे नाव पुढे केले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.