नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या किमतीत १ रुपया ६७ पैसे तर डिझेलच्या किंमतीत ७ रुपये १० पैशांची वाढ करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने मुल्यवर्धित करात वाढ केल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती कोसळल्या असतानाही दिल्ली सरकारने दरात वाढ केली आहे.
दिल्लीत लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. नव्या किंमतीनुसार आज ५ मेपासून दिल्लीत डिझेल ६९ रुपये २९ पैसे लिटर तर पेट्रोल ७१ रुपये २६ पैशांवर पोहचले आहे.
हेही वाचा - दिल्लीत स्पेशल 'कोरोना फी'; तळीरामांच्या खिशाला कात्री