ETV Bharat / bharat

काश्मिरात दहशतवाद्यांसोबत चकमक ; हिजबुल कमांडर रियाज ठार

अवंतीपोरा येथील चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून त्याच्याकडून एके 56 रायफल जप्त करण्यात आली आहे. तर परिसरातील सुमारे 12 ते 15 घरांमधील नागरीकांना बाहेर काढण्यात आले आहे.

One militant killed in   an encounter  at  Pampore area of Pulwama district

author img

By

Published : May 6, 2020, 12:59 PM IST

Updated : May 6, 2020, 6:08 PM IST

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात लष्कराने दहशतवाद्यांविरोधात आज पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. हिजबुल कमांडर रियाज नायको या कारवाईत ठार झाला आहे. दरम्यान, अवंतीपोरा येथील चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले असून त्यांच्याकडून एके 56 रायफल जप्त करण्यात आली आहे. तर परिसरातील सुमारे 12 ते 15 घरांमधील नागरीकांना बाहेर काढण्यात आले आहे.

काश्मीरात दहशतवाद्यांसोबत चकमक ; 2 दहशतवादी ठार

अवंतीपोरा येथे सैन्याने दहशतवाद्यांना घेरले असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. मध्यरात्रीपासून ही कारवाई सुरू आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सैन्याने या परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांविरूद्ध शोध मोहीम सुरू केली.

दोन दिवसांपूर्वी काश्मीरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्करातील कर्नल, मेजरसहर पाच जण हुतात्मा झाले होते. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवारा येथे ही घटना घडली. तर चांजामुल्ला भागात दोन दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला होता.

Last Updated : May 6, 2020, 6:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.