नवी दिल्ली - देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे देशाभरातील बळींची आकडा ५१९ झाला असून संसर्ग झालेल्यांची संख्या १६ हजार ११६ वर पोहोचली आहे.
देशासह संपूर्ण जगात खळबळ माजवणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत चालली आहे. जगभरातील वैज्ञानिक या विषाणूवर लस, औषधी शोधून या संसर्गाला आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात लागले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात १३ हजार २९५ लोक कोरोनाने संक्रमित आहेत. तर, २ हजार ३०२ जण या आजारातून उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यामध्ये ७७ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
देशात कोरोनामुळे एकूण ५१९ जणांचा बळी गेला असून सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या मृत्यूचा आकडा २११ वर पोहोचला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून येथे ७० जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, गुजरातमध्ये ५८, दिल्लीत ४३ आणि तेलंगणामध्ये १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये १७, पंजाबमध्ये १६, तामिळनाडूत १५, आंध्र प्रदेशमध्ये १५, राजस्थानमध्ये ११ आणि पश्चिम बंगाल येथे १२ जणांचा बळी गेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये ५, केरळ आणि हरियाणामध्ये प्रत्येकी ३, झारखंड आणि बिहारमध्ये प्रत्येकी २ मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, मेघालय, हिमाचल प्रदेश, ओडिसा आणि आसाममध्ये प्रत्येकी १ जण या संसर्गाला बळी पडला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात - ३ हजार ६५१, दिल्ली - १ हजार ८९३, मध्य प्रदेश - १ हजार ४०७, गुजरात - १ हजार ६०४, तमिलनाडू - १ हजार ३७२, राजस्थान - १ हजार ३५१, उत्तर प्रदेश - १ हजार ८४, तेलंगणा - ८४४, आंध्र प्रदेश - ६०३, केरळ - ४००, कर्नाटक - ३८४, जम्मू काश्मीर - ३४१, पश्चिम बंगाल - ३१०, हरियाणा - २२५, पंजाब - २०२, बिहार - ८६, ओडिसा - ६१, उत्तराखंड - ४२, हिमाचल प्रदेश - ३९, छत्तीसगड - ३५, चंडीगड - २३, लडाख - १८, अंडमान-निकोबार द्विप - १४, मेघालय - ११, गोवा - ७, पुड्डुचेरी - ७, मणिपूर - २, त्रिपूरा - २, मिझोरम - १ आणि अरुणाचल प्रदेश -१ केसेस पुढे आल्या आहेत. तर, वेबसाइटरील डेटानुसार राज्य-वार तपशीलांची तपासणी करणे आणि पुन्हा पुष्टी होणे बाकी आहे.
तर, दुसरीकडे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यातील लॉकडाऊनचा काळ ७ मेपर्यंत वाढवला आहे.