बंगळुरु - यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेश उत्सवावरही परिणाम जाणवत आहे. कोरोनामुळे गणेशमूर्ती तयार करणारे व्यवसायिक संकटात आले आहेत. कर्नाटकाच्या धारवड येथील गणेशमुर्तीकार मंजुनाथ हिरेमाथ यांनी आपली अडचण एका व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली होती. त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून विदेशातील काही लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बहरीन, कॅलिफोर्निया येथील नॉन भारतीय लोकांनी मंजुनाथ हिरेमाथ यांच्याशी झूम अॅपच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच त्यांना संपूर्ण मुर्त्या खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, यामध्ये त्यांनी एक अट ठेवली आहे. मंजुनाथ यांनी सर्व गणेश मुर्तींची पाच दिवसांसाठी स्थापना करावी आणि विधिवत पुजा करावी. तसेच झूम अॅपच्या माध्यमातून पुजा लाईव्ह करावी, अशी अट त्यांनी ठेवली आहे. हे विदेशी नागरिक आपल्या घरात बसून ऑनलाईन पद्धतीने गणेशत्सोव साजरा करणार आहेत.