ETV Bharat / bharat

..तर नितीश कुमार तुरुंगामध्ये असतील - चिराग पासवान

author img

By

Published : Oct 25, 2020, 4:35 PM IST

बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टी सत्तेत आल्यास नितीश कुमार हे जेलमध्ये असतील असे वक्तव्य लोजपाचे नेते चिराग पासवान यांनी केले आहे. ते बक्सरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना बोलत होते. बिहारच्या जनतेने लोजपाच्या पाठिशी उभे रहावे. लोजपा सोबतच भाजपच्या उमेदवारांना देखील मतदान करावे, आणि बिहार नितीश मुक्त करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

hirag Paswan on Nitish Kumar
चिराग पासवान

बक्सर - बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टी सत्तेत आल्यास नितीश कुमार हे तुरुंगामध्ये असतील, असे वक्तव्य लोजपाचे नेते चिराग पासवान यांनी केले आहे. ते बक्सरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना बोलत होते. बिहारच्या जनतेने लोजपाच्या पाठिशी उभे रहावे. लोजपा सोबतच भाजपाच्या उमेदवारांना देखील मतदान करावे, आणि बिहार नितीश मुक्त करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

बिहारमध्ये दारूबंदी करण्यात आली होती. मात्र, नितीश कुमार सरकारच्या काळात ही दारूबंदी अपयशी ठरली. राज्यात सहज दारू मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान बिहारमध्ये येत्या 28 ऑक्टोबरपासून विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांकडून निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असताना, दुसरीकडे मात्र लोक जनशक्ती पार्टी आणि जदयूमधील अंतर्गत वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन भाजप आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. मात्र, त्यांच्या अंतर्गत वादाचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसू शकतो, अशी चर्चा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.