कोलकाता - यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस अणि इतर पक्ष मिळून महाआघाडी करणार आहेत, अशी चर्चा होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम लागल्याचे चित्र आहे. या आघाडीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनीच राज्यातील सर्व जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. तर बसप अध्यक्ष मायावतींनीही काँग्रेस सोबतच्या आघाडीवर आपले मत स्पष्ट करून टाकले आहे.
दिवसेंदिवस लोकसभेच्या तारखा जवळ येत आहेत. यानुसार पक्षामध्ये राजकीय घडामोडी वाढलेल्या आहेत. मागील काही महिन्यापासून भाजपविरोधात महाआघाडीचे स्वप्न पाहिले जात होते. परंतु स्वतः ममता बॅनर्जी यांनीच आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. ममता बॅनर्जी यांनी जवळपास ४१ टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये मुनमुन सेन या अभिनेत्रीलाही उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी वर्तमान स्थितीतील १० खासदारांनाही गाळले आहे. बॅनर्जी यांनी जाहीर केल्याला उमेदवारांमुळे स्पष्ट झाले आहे की त्या राज्य स्तरावर कोणतीही आघाडी करणार नाहीत.
#LokSabhaElection2019 List of candidates for 42 seats in #Bengal pic.twitter.com/TRg59ktH5Q
— All India Trinamool Congress (@AITCofficial) March 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#LokSabhaElection2019 List of candidates for 42 seats in #Bengal pic.twitter.com/TRg59ktH5Q
— All India Trinamool Congress (@AITCofficial) March 12, 2019#LokSabhaElection2019 List of candidates for 42 seats in #Bengal pic.twitter.com/TRg59ktH5Q
— All India Trinamool Congress (@AITCofficial) March 12, 2019
तृणमूल काँग्रेस यावेळी ओडिशा, आसाम, झारखंड, बिहार आणि अंदमान या राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे तरी काँग्रस किंवा इतर पक्षांशी त्या आघाडी करणार का, यावर सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. ज्या नेत्यांना बॅनर्जी यांनी उमेदवारी दिलेली नाही. त्यांना पक्षाच्या कामाला लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.
दुसरीकडे बसपा अध्यक्ष मायावतींनी आज स्पष्ट करून टाकले आहे की काँग्रेस सोबत त्या कोणत्याच राज्यामध्ये आघाडी करणार नाहीत. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षसोबत त्यांनी आघाडी केली आहे. त्यामध्येही ३८-३८ जागा दोन्ही पक्षांनी वाटून घेतलेल्या आहेत. यामुळे बसपच्या वतीने महाआघाडीला पूर्णपणे राम राम ठोकण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये आणि उत्तर प्रदेशात सातही टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.