नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील अनेक राज्यात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे. याचा परिणाम लोकसभा आणि विधानसभेवर पडला असून दोन्ही सभागृहाचे कामकाज आज तहकूब करण्यात आले आहेत.
-
Lok Sabha adjourned sine die post passage of Finance Bill. #Coronavirus pic.twitter.com/hQHumABDwn
— ANI (@ANI) March 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Lok Sabha adjourned sine die post passage of Finance Bill. #Coronavirus pic.twitter.com/hQHumABDwn
— ANI (@ANI) March 23, 2020Lok Sabha adjourned sine die post passage of Finance Bill. #Coronavirus pic.twitter.com/hQHumABDwn
— ANI (@ANI) March 23, 2020
देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. २२ मार्चला देशाचे पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते, ज्याला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. यानंतर, देशातील अनेक राज्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याचा परिणाम हा सभागृहाच्या कामकाजावरही पडला आहे. सध्याची परिस्थिती आणि खबरदारी म्हणून दोन्ही सभागृहाचे कामही थांबवण्यात आले आहे. लोकसभेमध्ये वित्त बिल पास केल्यानंतर लोकसभा तहकूब करण्यात आली आहे.
हेही वाचा - संतापजनक! मणिपूरच्या युवतीला 'कोरोना' म्हणत तिच्यावर गुटखा थुंकून स्कूटरचालक फरार..