हैदराबाद -कोरोनामुळे देशातील बहुतांश विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. असे असले तरी हैदराबादमधील जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.
विद्यापीठाने पदवीचे शिक्षण घेणारे आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
अभियांत्रिकी, औषधी आणि व्यवस्थापनातील विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी काय करावे व काय करू नये, याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत
परीक्षांचे वेळापत्रक -
चौथ्या वर्षातील द्वितीय सत्र- बी. टेक व बी. फार्म-20-06-2020
सत्र (नियमित)-बी. टेक व बी. फार्म- प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष 16-07-2020
जुने सत्र (पुरवणी )बी. टेक व बी. फार्म- 03-08-2020
महत्वाच्या सूचना -
परीक्षेचा वेळ 2 तास असणार आहे.
एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्यात येणार आहे.
हे नियम कर्मचारी व विद्यार्थ्यांना पाळावे लागणार:
विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मास्क घालावे लागणार आहेत. त्यांना सॅनीटायझर देण्यात येणार आहे.
महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.