बिहार - पुर्व बिहार आणि नेपाळच्या तराई भागात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यात मागील काही दिवसांपासून हाहाकार उडाला आहे. आत्तापर्यंत पुरामध्ये १६५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. हवाई दलाच्या सेंट्रल कमांडने (मध्य विभाग) दरभंगा, सीतामढी आणि मधुबनी जिल्ह्यामंध्ये मदतीसाठी दोन हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत.
-
Bihar: Indian Air Force (IAF) Central Air Command has deployed two helicopters at Darbhanga to provide relief to flood affected victims in the districts of Darbhanga, Sitamarhi and Madhubani. pic.twitter.com/oIVyeskNjl
— ANI (@ANI) July 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bihar: Indian Air Force (IAF) Central Air Command has deployed two helicopters at Darbhanga to provide relief to flood affected victims in the districts of Darbhanga, Sitamarhi and Madhubani. pic.twitter.com/oIVyeskNjl
— ANI (@ANI) July 24, 2019Bihar: Indian Air Force (IAF) Central Air Command has deployed two helicopters at Darbhanga to provide relief to flood affected victims in the districts of Darbhanga, Sitamarhi and Madhubani. pic.twitter.com/oIVyeskNjl
— ANI (@ANI) July 24, 2019
हेलिकॉप्टरद्वारे पुरग्रस्तांना सुरक्षीतस्थळी हलविण्यात येत आहे. तसेच पुरात अडकलेल्या लोकांना गरजेचे साहित्य पुरवण्यात येत आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला असून जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे.
सरकारकडून बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. सरकार सर्वांना मदत करत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे लोक म्हणत आहेत. पुराचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या १९९ मदत केंद्रांमध्ये सुमारे १ लाख ६६ हजार नागरिकांनी आसरा घेतल्याचे सरकारने सांगितले आहे. यामध्ये वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. १२ जिह्यातील ७८ प्रभागांमधील ५५५ ग्रामपंचायतींमध्ये मागीला आठवड्यात पाणी शिरले होते.
पुर्णिया जिल्ह्यातील नद्यांमध्ये सतत पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. आमौर, बैसा, डगरुआ, जलालगढ आणि बायसी या भागांना पुराने घेरले आहे. तर बकरा, कारी, सौरा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
पुर्णिया जिल्ह्यात शेतजमीनी पाण्याखाली -
सिंघीया, सरसी, मोहनिया, चकला, जगेली, धसिया यासह कप्तान पाडा, माधोपाडा या भागातील शेतांमध्ये पाणी शिरले आहे. पाण्यामुळे, केळी, मुग आणि धान पिकाचे नुकसान झाले आहे. मागील २ ते ३ दिवसांपासून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे पुर्णिया जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांनी सांगितले.