नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीच्या बिजवासन भागातील आंबेडकर कॉलनीमध्ये आज पहाटे आग लागली. याठिकाणी अग्निशामक दलाचे १४ बंब दाखल झाले होते. या आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आले नाही.
-
Delhi: Fire that broke out at a warehouse in Bijwasan today has been brought under control. https://t.co/Z7i3exjlup pic.twitter.com/44MPkzwx9p
— ANI (@ANI) February 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: Fire that broke out at a warehouse in Bijwasan today has been brought under control. https://t.co/Z7i3exjlup pic.twitter.com/44MPkzwx9p
— ANI (@ANI) February 7, 2020Delhi: Fire that broke out at a warehouse in Bijwasan today has been brought under control. https://t.co/Z7i3exjlup pic.twitter.com/44MPkzwx9p
— ANI (@ANI) February 7, 2020
आंबेडकर कॉलनीमधील एका वेअरहाऊसला पहाटे ४.३० च्या दरम्यान आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीची माहिती मिळताच विविध अग्निशामक केंद्रांमधून साधारणपणे १४ बंब घटनास्थळी पाठवण्यात आले. या वेअरहाऊसच्या पहिल्या मजल्याला आणि तळमजल्याला आग लागल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे, वा जखमी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. तसेच, आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हेही वाचा : कोरोनाविषयी सर्वात अगोदर माहिती देणाऱ्या डॉक्टरचाच कोरोनाने मृत्यू