नवी दिल्ली: कोरोना काळात अँटीबायोटिक्सचा वाढता वापर अधिक प्रतिरोधकपणे प्रतिकार करू शकतो, असे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले. तसेच सॅनिटायझर्स आणि अँटीमाइक्रोबियल साबणांचा जास्त वापर केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशारा देखील त्यांनी दिला.
एम्सच्या सूक्ष्मजीवशास्र विभाग आणि अमेरिकन सुक्ष्मजीवशास्त्र सोयटीच्या वतीन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमा चौधरी, अमेरिकन राजदूत डॉ. बिमल कुमार, डॉ. सरिता मोहपात्रा, डॉ. गगनदीप सिंह, डॉ. हितेंद्र गौतम आणि डॉ. निशांत वर्मा यांची उपस्थिती होती. वेबिनारमध्ये जगभरात पसरलेल्या कोरोना या रोगाविषयी चर्चा आणि चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच संभाव्य धोक्याविषयी माहिती देण्यात आली. यात मुख्यत्वे कोरोना काळात कोरोना काळात जास्त वापरण्यात येत असलेल्या सॅनिटायझरचा विषय चर्चिला गेला. आणि त्यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली. सॅनिटायझरचा जास्त वापर धोकादायक असल्याचे तज्ञांनी यावेळी सांगितले.