ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचारात २७ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री केजरीवाल यांची संवेदनशील भागांना भेट

author img

By

Published : Feb 26, 2020, 9:08 AM IST

Updated : Feb 27, 2020, 2:01 AM IST

ईशान्य दिल्लीमध्ये हिंसाचारात बळी पडलेल्यांची संख्या २७ झाली आहे. तर जखमींची संख्या दीडशेहून अधिक झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहे.

दिल्ली हिंसाचार
दिल्ली हिंसाचार

LIVE:

  • मुख्यमंत्री केजरीवाल हे दिल्लीतील हिंसाग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यांनी काही संवेदनशील भागांना भेट देत तिथल्या स्थानिकांशी चर्चा केली.
  • दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत १८ एफआयआर दाखल केले आहेत, तसेच १०६ लोकांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हिंसा करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आज दिवसभरात कोणतीही हिंसाचाराची घटना झाली नाही. परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. - दिल्ली पोलीस प्रवक्ते एम. एस. रंधावा.
    मौजपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात
  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घेणार हिंसाग्रस्त भागाचा आढावा..
  • हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी दूतावासाने भारतातील अमेरिकन नागरिकांसाठी सल्ला देणारे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये शक्य असल्यास घराबाहेर पडणे टाळा, ज्या ठिकाणी दंगे होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी जाणे टाळा, स्थानिक प्रशासनाने दिलेले आदेश पाळा आणि स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवा अशा सूचनांचा समावेश आहे.
  • दिल्लीच्या हिंसाग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीसाठी गृहमंत्रालयात दाखल झाले आहेत.
  • उत्तर-पूर्व दिल्लीमधील परीक्षा स्थगित

उत्तर-पूर्व दिल्लीमधील हिंसाचारानंतर तणावपूर्ण स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) इंग्रजीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी याबाबत माहिती दिली. २७ फेब्रुवारीला १२व्या इयत्तेची इंग्रजीची परीक्षा होणार होती. हा पेपर आता कधी होणार याबाबत लवकरच माहिती देण्यात येणार आहे. तसेच, दिल्लीच्या इतर भागांमध्ये नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा सुरू राहणार आहेे, हेही त्रिपाठी यांनी सांगितले.

  • दिल्लीतील लोकांना हिंसा नको आहे, हे काही समाजकंटकांचे काम. तर, रतनलाल यांच्या कुटुंबीयांना देणार एक कोटीची मदत, कुटुंबातील एका सदस्याला मिळणार नोकरी - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल.
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यावा - काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींची मागणी..
  • परिस्थिती नियंत्रणात आहे, पोलीस त्यांचे काम करत आहेत. लोक आमच्या कामाने समाधानी आहेत - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल.
  • भाजप नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आदेश..

दिल्ली उच्च न्यायालयाने प्रक्षोभक भाषणे केल्याबद्दल कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकूण मृतांची संख्या २४, तर २०० हून अधिक लोक जखमी..
  • जीटीबी रूग्णालयात एकूण २२ लोकांचा मृत्यू, २००हून अधिक लोकांवर केले उपचार. बहुतांश रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, ३५ रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत - जीटीबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुनिल कुमार यांची माहिती.
  • आम्हाला सध्या लष्कराला पाचारण करावे की नाही याबाबत चर्चा करायची नाही, तर सध्या आपण गुन्हे नोंदवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सद्यपरिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची माहिती.
  • हिंसाचारातील बळींची संख्या २२ वर, गुरू तेज बहादुर रूग्णालयात २१ तर लोकनायक जयप्रकाश नारायण रूग्णालयात एकाचा मृत्यू.
  • "शांतता आणि एकोपा आपल्या संस्कृतीचा मूळ गाभा आहे. दिल्लीकरांनी शांतता बाळगावी. लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी हे सर्वांसाठीच गरजेचे आहे. मी दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा आहे. सुरक्षा दले शांतता प्रस्थापित होण्यासाठी लोकांमध्ये जाऊन काम करत आहेत", असा संदेश पंतप्रधान मोदींनी देशवासियांना ट्विटरवरून दिले आहे.
  • दिल्लीचे मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी - सोनिया गांधी
  • आज काँग्रेसचा राष्ट्रपती भवनावर मोर्चा
  • भाजप नेत्यांच्या भडक वक्तव्यांमुळेच हिंसा, अमित शाहांनी राजीनामा द्यावा. दिल्ली हिंसेमागे सुनियोजित कट - सोनिया गांधी
  • सोनिया गांधींनी उपस्थित केले प्रश्न..
  • मागील आठवड्यापासून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काय करत होते?
  • किती पोलीस तैनात करण्यात आले होते?
  • गुप्तचर यंत्रणांकडून काय माहिती मिळाली?
  • पोलिसांना अपयश आल्याने केंद्रीय पोलिसांना का बोलावले नाही?
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली.
  • नागरिकांना शांततेचे केले आवाहन.
  • दिल्लीमधील परिस्थिती हाताळताना पोलीस अपयशी, लष्कराला पाचारण करण्याची मुख्यमंत्री केजरीवालांची मागणी. केंद्रीय गृहमंत्रालयाला लिहले पत्र.
  • दिल्ली हिंसाचारात मृतांची संख्या २०. एकूण १८९ जखमींना रुग्णालयात आणण्यात आले होते, त्यापैकी २० जणांचा मृत्यू झाला आहे - गुरु तेग बहादूर रुग्णालय
  • मृतांची संख्या १८ झाल्याची माहिती गुरु तेग बहादुर रुग्णालयाचे एमडी सुनील कुमार गौतम यांनी दिली.
  • दिल्लीमध्ये तीन दिवसांच्या हिंसेनंतर शांतता. हिंसाचार झालेल्या भागात अतिरिक्त सैन्य तैनात. दिल्ली पोलिसांनी जाफराबाद मेट्रो स्टेशनखाली बसलेल्या आंदोलकांना हटवले.
  • सीलमपूर, मौजपूर, भजनपुरा आणि गोकुलपूरी परिसरात सुरक्षा दल तैनात, परिसरात शांतता
  • ईशान्य दिल्लीत जाळपोळ आणि हिंसाचारात आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानी दिल्ली मागील ३ दिवसांपासून धगधगत आहे. जाळपोळ आणि हिंसाचारात आत्तापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील ईशान्य भागातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.

नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे आणि समर्थन करणारे दोन गट एकमेकांसमोर आल्याने २३ तारखेपासून दिल्लीत हिंसाचार पसरला आहे. साध्या बाचाबाचीचे रुपांतर हिंसक आंदोलनात झाले असून अनेक आंदोलकांनी घरे,दुकाने, गाड्या, सार्वजनिक मालमत्तेला आगी लावल्या, तसेच तोडफोडही केली. अनियंत्रित नागरिकांचे टोळके काठ्या, दांडके घेवून रस्त्यावंरून फिरत आहेत. अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटनाही घडल्या. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

आंदोलकांनी नियंत्रणात आणताताना एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. तर दीडशेपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. अनेक नागरिक भीतीने घरांमध्ये कड्या लावून बसले आहेत. ईशान्य दिल्लीतील अनेक भागात धुराचे लोट उठले होते. पोलिसांनी काही भागात एक महिन्यापर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच 'शूट अ‌ॅड साईट'चे आदेशही देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक आहे, त्यामध्ये दिल्ली हिंसाचारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Feb 27, 2020, 2:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.