ETV Bharat / bharat

'कोरोनाला घाबरू नका, सावध अन् सतर्क राहा'

author img

By

Published : May 28, 2020, 8:27 AM IST

कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणूला न घाबरता, लोकांनी सावध आणि सतर्क राहावे, असे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले. लोकांनी कोरोनाबाबत कोणतीही भीती किंवा चिंता बाळगू नये. कितीही रुग्णांवर उपचार करण्यास सरकार तयार आहे, असेही ते म्हणाले.

तेलंगाणा मुख्यमंत्री
तेलंगाणा मुख्यमंत्री

हैदराबाद - कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणूला न घाबरता, लोकांनी सावध आणि सतर्क राहावे, असे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले. अंदाजानुसार येत्या दोन ते तीन महिन्यांत देशात सकारात्मक घटनांमध्ये वाढ होऊ शकते, असेही ते म्हणाले.

लोकांनी कोरोनाबाबत कोणतीही भीती किंवा चिंता बाळगू नये. कितीही रुग्ण वाढले तरी उपचार करण्यास सरकार सज्ज आहे. आवश्यक पीपीई किट, चाचणी किट, मास्क, बेड, व्हेंटिलेटर, रुग्णालये सर्वच तयार आहे, असे राव म्हणाले. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोरोनामुळे जगभरात होणाऱ्या घडामोडींचे परीक्षण करणारे वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ आणि राज्यस्तरीय समित्यांनी मुख्यमंत्री व मंत्र्यांना सद्यस्थिती स्पष्ट केली.

कोरोनाला घाबरू नये. जगभरात झालेल्या अभ्यासानुसार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) च्या अंदाजानुसार, विषाणूचा फैलाव असूनही, लक्षणे बहुतेक लोकांमध्ये दिसून येत नाहीत. विषाणूची लागण झालेल्या सुमारे 80 टक्के लोकांमध्ये कोणतीही लक्षणे नसतात आणि त्यांना उपचारांची आवश्यकता नसते, असे त्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार झाला नाही. कोरोनाची भिती बाळगू नये. मात्र, कोरोनावर औषध आणि लस नसल्यामुळे लोकांनी सतर्क असले पाहिजे. त्यांनी वैयक्तिक खबरदारी घ्यावी, असे वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान चंद्रशेखर राव यांनी लॉकडाऊन मार्गदर्शक सूचनांमध्ये शिथिलता असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच वैद्यकीय व आरोग्य विभागाला सतर्क राहण्यास सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.