नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने नरेंद्र मोदींच्या फिट इंडिया या कार्यक्रमावर हल्लाबोल केला आहे. 'अर्थव्यवस्थेचे अर्थ बिघडले, रुपया कंगाल झालाय, व्यवसाय सारे बंद झाले, ही मोदींची कमाल', असे काँग्रेसने टि्वट केले असून यात एक व्हिडिओही शेअर केला आहे.
-
अर्थव्यवस्था का अर्थ बिगाड़ा, रुपया हुआ कंगाल।
— Congress (@INCIndia) August 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
धंधे सारे बंद हो गए, ये है मोदी का कमाल।।#UnfitGovtUnfitEconomy pic.twitter.com/JPRi3CJpKi
">अर्थव्यवस्था का अर्थ बिगाड़ा, रुपया हुआ कंगाल।
— Congress (@INCIndia) August 29, 2019
धंधे सारे बंद हो गए, ये है मोदी का कमाल।।#UnfitGovtUnfitEconomy pic.twitter.com/JPRi3CJpKiअर्थव्यवस्था का अर्थ बिगाड़ा, रुपया हुआ कंगाल।
— Congress (@INCIndia) August 29, 2019
धंधे सारे बंद हो गए, ये है मोदी का कमाल।।#UnfitGovtUnfitEconomy pic.twitter.com/JPRi3CJpKi
आरबीआयला लुटल्यानंतर सरकारने करदात्यांना इतके तरी सांगायला हवे की, त्यांच्या पैशाचा कुठे आणि कसा उपयोग केला जाणार आहे. दुर्दैवाने सरकारचे पारदर्शी होणे हे भाजपला अर्थव्यवस्था सुधारण्यास सांगण्यासारखे असून या दोन्ही गोष्टी अशक्य आहेत, असे टि्वट काँग्रेसने केले आहे.
'रुपया झाला बेहाल, पाहा साहेबांचा कमाल, रुपया खाली, साहेब वरती, परिस्थिती झाली खराब, या आशयाचे टि्वट काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत टि्वटरवर शेअर केले आहे.
हेही वाचा - पत्नीचे भारतीयत्व सिद्ध न होण्याच्या भीतीने पतीची आत्महत्या
फीच इंडिया रेटींगने यावर्षी भारताचा जीडिपी हा 6.7 टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी हा अंदाज 7.3 टक्के होता.
हे ही वाचा - इम्रान खान यांचा नया पाकिस्तान लष्कराच्या वर्चस्वाखाली - अमेरिका काँग्रेस अहवाल
यापुर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी केंद्र सरकारला हस्तांतिरत करण्यात येत असल्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला होता. पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आरबीआयमधून पैसे चोरल्याचा त्यांनी आरोप केला होता. स्वत: केलेले आर्थिक संकट दूर कसे करायचे, हे पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना माहित नसल्याची टीका राहुल गांधींनी केली.