झारखंड - राज्यातील चतरा येथे कर्तव्यावर असणारा एक सीआयएसएफचा जवान बेपत्ता झाला आहे. हा जवान पिपरवार ठाणा क्षेत्रातील सीसीएल एनके या वर्कशॉपमध्ये तैनात असल्याची माहिती समोर आली आहे. अपहरणाचा संशय असल्याने बटालियनने पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ आशुतोष सत्यम यांनी आपल्या टीमसोबत शोध सुरू केला आहे. मात्र, या जवानाचा अद्यापही तपास लागलेला नाही. कर्तव्यावर असताना हा जवान बेपत्ता झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरूवात केली आहे.