नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्ण संख्या वाढतच आहे. कोरोना काळात देशाअंतर्गत पर्यटन आणि यात्रा क्षेत्रात तब्बल 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज लावण्यात आला आहे. भारतीय उद्योग परिसंघ (सीआईआई) आणि हॉस्पिटॅलिटी कंसल्टिंग कंपनी होटेलिवाटेच्या अहवालानुसार संघटित पर्यटन क्षेत्रालाच 25 अब्ज डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार भारतीय पर्यटन क्षेत्रासमोर हे सर्वांत मोठे संकट आहे. या संकटाने देशाअंतर्गत पर्यटनासह आंतराष्ट्रीय पर्यटनाला प्रभावीत केले आहे. लॉकडाऊनचा परिणाम फक्त ऑक्टोंबरपर्यंत राहिल, असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळीच आहे. येत्या वर्षाच्या सुरवातीला हॉटेलमधील फक्त 30 टक्केच खोल्याचे बुकिंग होईल, असे अवहालात म्हटले आहे. तसेच अर्थव्यवस्थेत म्हत्वाच भूमिका बजावणाऱ्या पर्यटनासारख्या उद्योगाचे कंबरडे या संकटाने मोडले आहे.
अभ्यासानुसार, जानेवरी 2020 मध्ये हॉटेलमधील खोल्यांचे 80 टक्के, फेब्रुवरीमध्ये 70 टक्के, मार्चमध्ये 45 टक्के, एप्रिलमध्ये 7 टक्के बुकिंग झाले होते. हे प्रमाण मे, जुन, जुलै आणि ऑगस्टमध्ये राहिले आहे.