पाटणा - सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आनंदी असल्याचे ट्वीट बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केले आहे. हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा लढा आहे. नक्कीच सुशांतला न्याय मिळेल. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्रात गेलेल्या आमच्या आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी कैद्यासारखं ठेवलं, असा आरोप बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केली.
-
I am very happy. The Supreme Court's order has strengthened the trust people have in the Court and has assured the nation that justice will be delivered in the #SushantSinghRajput's death case: Bihar DGP Gupteshwar Pandey pic.twitter.com/VFxOgbDrXE
— ANI (@ANI) August 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I am very happy. The Supreme Court's order has strengthened the trust people have in the Court and has assured the nation that justice will be delivered in the #SushantSinghRajput's death case: Bihar DGP Gupteshwar Pandey pic.twitter.com/VFxOgbDrXE
— ANI (@ANI) August 19, 2020I am very happy. The Supreme Court's order has strengthened the trust people have in the Court and has assured the nation that justice will be delivered in the #SushantSinghRajput's death case: Bihar DGP Gupteshwar Pandey pic.twitter.com/VFxOgbDrXE
— ANI (@ANI) August 19, 2020
आम्ही बरोबर होतो. हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट होत आहे. या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांनी काय केले, हे सर्वांनी पाहिले, अशीही टीका त्यांनी केली.
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने १४जून रोजी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याची टीका होऊ लागली. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीने त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केले. यासंबंधी एक तक्रार बिहार पोलिसांकडे दाखल झाली होती. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांचा एक वरिष्ठ अधिकारी मुंबईत दाखल झाला. मात्र महाराष्ट्रात येताच संबंधित अधिकाऱ्याला महाराष्ट्र प्रशासनाने क्वारन्टाइन केले. यावरून हे प्रकरण आणखी चिघळले.
-
#WATCH Bihar DGP says, "I'm very happy. SC order has strengthened trust people have in the Court & has assured the nation that justice will be delivered...Today's verdict has proved that Bihar Police was correct. The way Mumbai Police behaved was illegal." #SushantSinghRajput pic.twitter.com/Odq9TXTiGK
— ANI (@ANI) August 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Bihar DGP says, "I'm very happy. SC order has strengthened trust people have in the Court & has assured the nation that justice will be delivered...Today's verdict has proved that Bihar Police was correct. The way Mumbai Police behaved was illegal." #SushantSinghRajput pic.twitter.com/Odq9TXTiGK
— ANI (@ANI) August 19, 2020#WATCH Bihar DGP says, "I'm very happy. SC order has strengthened trust people have in the Court & has assured the nation that justice will be delivered...Today's verdict has proved that Bihar Police was correct. The way Mumbai Police behaved was illegal." #SushantSinghRajput pic.twitter.com/Odq9TXTiGK
— ANI (@ANI) August 19, 2020
महाविकास आघाडी सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र सुशांतच्या कुटुंबीयांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास देण्याची मागणी केली. या प्रकरणात रिया चक्रवर्तीने सर्वेच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकऱणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यासाठी संबंधित सर्व कागदपत्रांची तसेच पुराव्यांची पूर्तता मुंबई पोलिसांनी सीबीआयला करावी, असे यामध्ये नमूद आहे.