ETV Bharat / bharat

काबूल: मॅग्नेटिक आईडी स्फोटात ३ जणांचा मृत्यू, तर १० जण जखमी

या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. एका कारमध्ये हा मॅग्नेटिक आईडी ठेवण्यात आला होता. अशी माहिती काबूल पोलिसांनी दिली.

मॅग्नेटिक आईडी स्फोटात ३ जणांचा मृत्यू
मॅग्नेटिक आईडी स्फोटात ३ जणांचा मृत्यू
author img

By

Published : Oct 27, 2020, 10:16 PM IST

काबूल- डाऊनटाऊनमधील चारकाला येथे आज मॅग्नेटिक आईडी स्फोट घडला. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. एका कारमध्ये हा मॅग्नेटिक आईडी ठेवण्यात आला होता. अशी माहिती काबूल पोलिसांनी दिली.

मॅग्नेटिक आईडी स्फोटात ३ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमध्ये तालीबान आणि सरकारमध्ये शांतता वार्ता सुरू आहे. असे असताना ही घटना घडून आली आहे. दरम्यान, या वर्षी देशातील नागरी दुर्घटनेची आकडेवारी समोर आली आहे. यूएन मिशन टू अफगाणिस्तानच्या अहवालानुसार (यूएनएएमए) गेल्या ९ महिन्यात देशातील नागरी दुर्घटनेच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के घट झाली आहे. जरी ही आकडेवारी कमी असली तरी देशातील नागरिकांना झालेली दुखापत ही आश्चर्यजनक असल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे.

देशात उच्च पातळीच्या हिंसात्मक घटना घडत असून त्याचा नागरिकांवर मोठा प्रभाव पडत आहे. अफगाणिस्तान हा राहण्याच्या दुष्टीकोनातून अत्यंत प्राणघातक देश असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी देखील काबूलमधील पूल-ए-खोश्क भागातील कसवर-ए-दानीश शैक्षणिक केंद्राजवळ आत्मघाती बॉम्ब हल्ला झाला होता. या घटनेत ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून ७० नागरिक जखमी झाले आहेत.

हेही वाचा- बिहार विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यात युवा नेत्यांचे राजकीय भविष्य मतदारांच्या हातात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.