ETV Bharat / bharat

शिरीन मोदी खूनप्रकरणी मृत नोकरावर गुन्हा दाखल

गोव्यातील महिला कलाकार शिरीन मोदी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरी माळीकाम करणारा नोकर प्रफुल जेना (वय 61) याने केल्याचे समोर आले आहे. मात्र, खून करून पळून जाताना या नोकराने कुंपणावरून उडी मारली आणि तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.

शिरीन मोदी खून प्रकरणी मृत नोकरावर गुन्हा दाखल
author img

By

Published : Oct 7, 2019, 5:38 PM IST

पणजी - उत्तर गोव्यातील हडफडे येथील रहिवासी महिला कलाकारावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. शिरीन मोदी (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे. प्राथमिक चौकशीत हा हल्ला त्यांच्या घरी माळीकाम करणारा नोकर प्रफुल जेना (वय 61) याने केल्याचे समोर आले आहे. मात्र, खून करून पळून जाताना या नोकराने कुंपणावरून उडी मारली आणि तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.

शिरीन मोदी खून प्रकरणी मृत नोकरावर गुन्हा दाखल

हणजुणे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी घटनेविषयी माहिती दिली. शिरीन मोदी या मूळ मुंबईच्या असून मागील 20 वर्षांपासून मुलीसह गोव्यात वास्तव्य करत होत्या. त्यांच्या घरात चार भाडेकरू कुटुंब राहतात. ते सर्वजण एकत्रित जेवण करत असत. जेना त्यांच्याकडे माळी म्हणून काम करत असताना काम व्यवस्थित करत नसल्याने शिरीन त्याला वारंवार सूचना करायच्या. यावरुन दोघांत वाद होत असे. रविवारी असाच वाद झाला आणि जेनाने शिरीन यांच्या डोक्यावर लोखंडी दांड्याने वार केला. त्यावेळी त्या जमिनीवर कोसळल्या. यानंतर नोकराने कुंपणावरून उडी टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घरकाम करणाऱ्या व्यक्तींनी शिरीन यांना गोमेकॉत दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस निरीक्षक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हणजुणे पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Intro:पणजी : उत्तर गोव्यातील हडफडे येथे रविवारी (दि.6) घरमालक शिरीन मोदी यांचा खून करून पळून जाताना नोकराचीही म्रूत्यू झाला. प्राथमिक तापासानंतर पोलिसांनी संशयित म्रूत नोकर प्रफुल जेना याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Body:गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या हडफडे मध्ये कलाकार शिरीन मोदी (65 वर्षे) राहत होत्या. त्यांच्यावर त्यांच्याकडे माळी म्हणून काम करणाऱ्या जेना (61 वर्षे) यांनी रविवारी लोखंडी दांड्याने हल्ला केला. यामध्ये शिरीन यांचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान म्रुत्यु झाला. तर संशयित खुनी प्रफुल जेना खून करून पळत असताना रस्त्यावर पडून त्याचाही म्रूत्यू झाला.
घटनेची माहिती देताना हणजुणे पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांनी सांगितले की, सदर घटना रविवारी सकाळी घडली. मोदी यांच्यावर त्यांच्याच नोकराने हल्ला केला. ज्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान म्रूत्यू झाला. तर त्यांच्यावर हल्ला करून पळून जाणारा संशयित नोकर याही म्रूत्यू झाला. परंतु, प्राथमिक तपासणी नंतर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीन मोदी या मूळ मुंबईच्या असून मागील 20 वर्षांपासून मुलीसह गोव्यात वास्तव्य करत होत्या. त्यांच्या घरात चार भाडेकरू कुटुंब राहतात. ते सर्वजण एकत्रित जेवण करायचे. जेना त्यांच्याकडे माळी म्हणून काम करत असताना काम व्यवस्थित करत नसल्याने शिरीन त्याला सूचना करायच्या. यावरुन दोघांत वाद होत असे. रविवारी असाच वाद झाला आणि जेनाने शिरीन यांच्या डोक्यावर लोखंडी दांड्याने वार केला. त्यावेळी त्या जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे संशयित नोकर पळून कुंपणावरून उडी टाकून पळून गेला. तर घर काम करणाऱ्या कामगारांनी शिरीन यांना गोमेकॉत दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचा म्रूत्यू झाला.
तर पळून जाणारा संशयित जेना एका कठड्यावरून उतरताना असताना रस्त्यावर कोसळला आणि गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा इस्पितळात हलवण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा म्रूत्यू झाला.
पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हणजुणे पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.