जयपूर - कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११ हजाराच्यावर पोहोचली आहे. मात्र, या काळात एअरलाईन्स कंपन्या आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. एअर इंडियासह अनेक खासगी एअरलाईन्स कंपन्यांचे जवळपास २४० विमान वैद्यकीय उपकरणे, औषधांची वाहतूक करत आहे. त्यामुळे कोरोना संकटात खूप मोठा फायदा होत आहे.
देशात कोरोनाने पाय पसरायला सुरुवात करताच लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. यामध्ये हवाई वाहतुकीसह सर्व वाहतूक ठप्प झाली. मात्र, वैद्यकीय साहित्य पोहोचवण्यासाठी हवाई वाहतुकीचा वापर केला जात आहे. आतापर्यंत जयपूरवरून जवळपास ४१५ टन वैद्यकीय साहित्य वेगवेगळ्या शहरात पाठवण्यात आली. यामध्ये एअर इंडियाची प्रमुख भूमिका आहे. यासोबतच २३० कार्गो फ्लाईटमधून २ हजार ७६५ टन, ब्लू डार्ट १०८ कार्गो फ्लाईटमधून १ हजार ७०९ टन आणि इंडिगो फ्लाईटमधून २१.७७ टन वैद्यकीय साहित्याची वाहतूक करण्यात आली.
गुरुवारी जयपूर विमानतळावरून भारतीय वायूसेनेच्या विमानाने स्वच्छतेसंबंधी साहित्य प्रयागराजला पाठवण्यात आले. यामध्ये बायोडिग्रेडेबल पॉलीबॅगचे ८० कार्टन देखील पाठवले.