ETV Bharat / bharat

गुजरातमध्ये तिहेरी अपघातात नऊ ठार, २४ जखमी, एसटी-ट्रक-जीपमध्ये झाली टक्कर..

author img

By

Published : Mar 2, 2020, 7:30 PM IST

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनगढ डेपोची एसटी बस (क्र. जीजे १८ झेड ६४६८) ही कुशलगढहून उकाई गावाकडे जात होती. यावेळी पोखरण गावाजवळ, अचानक तिने समोरून येणाऱ्या टँकरला (क्र. जीजे ०२ एक्सएक्स ६५८८) धडक दिली. यादरम्यान, दुसरा एक टेम्पो (क्र. एमएच ४१ एएच ५३०९) या दोन्ही वाहनांना येऊन धडकला. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

9 killed and 24 injuerd in accident between st bus tanker and jeep
गुजरातमध्ये तिहेरी अपघातात नऊ ठार, तर २४ जखमी..

गांधीनगर - गुजरातच्या तापी जिल्ह्यामध्ये झालेल्या तिहेरी अपघातात नऊ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर २४हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील पोखरण गावाजवळ एस.टी. बस, टँकर आणि जीपमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची भीषणता एवढी होती, की जीपचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनगढ डेपोची एसटी बस (क्र. जीजे १८ झेड ६४६८) ही कुशलगढहून उकाई गावाकडे जात होती. यावेळी पोखरण गावाजवळ, अचानक तिने समोरून येणाऱ्या टँकरला (क्र. जीजे ०२ एक्सएक्स ६५८८) धडक दिली. यादरम्यान, दुसरी एक जीप (क्र. एमएच ४१ एएच ५३०९) या दोन्ही वाहनांना येऊन धडकली. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

या अपघातामध्ये तिन्ही वाहनांच्या चालकांसह एकूण नऊ लोकांचा जीव गेल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अपघाताची भीषणता पाहता हा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, २४ जखमींना सोनगढ, आणि व्यारा याठिकाणच्या रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या अपघातानंतर काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरूवात केली. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

हेही वाचा : निर्भया प्रकरण : आरोपींची फाशी चौथ्यांदा पुढे ढकलली, दिल्लीतील न्यायालयाचा निर्णय..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.