बरेली - उत्तर प्रदेशातील बिसलपूर रस्त्यावर ट्रक, दुचाकी आणि गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकूण 7 जण ठार झाले असून त्यात एकाच कुटुंबातील 5 जण होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
बिसलपूर रोडवर एका वेगवान ट्रकने दुचाकीला धडक दिली, ज्यात पत्नीचा मृत्यू झाला असून पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रकने एका कारला धडक दिली. ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 लोक ठार झाले असून गाडीच्या चालकाचा मृत्यू झाला आहे.