झारखंड - दुमका जिल्ह्यातील चंदन पहाडी गावामधील एका लग्नात स्वयंपाकातून तब्बल 60 लोकांना विषबाधा झाली आहे. सर्व लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंदन पहाडी गावामधील एका लग्नातील स्वयंपाकात पाला पडल्यामुळे सुंपूर्ण अन्न विषबाधित झाले. हेच अन्न लोकांनी खाल्यामुळे त्यांना विषबाधा झाली आहे. यामध्ये लहाणमुलांनादेखील विषबाधा झाली आहे. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी रुग्णांना आवश्यक औषधे दिली आहेत. परिस्थिती नियंत्रनात आली आहे.