ETV Bharat / bharat

चिंताजनक..! नव्या कोरोना विषाणूचे सहा रुग्ण भारतात सापडले

author img

By

Published : Dec 29, 2020, 12:17 PM IST

Updated : Dec 29, 2020, 12:44 PM IST

कोरोना विषाणूने सर्वांना आधीच जेरीस आणले असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. ब्रिटनवरून प्रवास करून भारतात आलेल्या सहा प्रवांशांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - कोरोना विषाणूने सर्वांना आधीच जेरीस आणले असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. ब्रिटनवरून प्रवास करून भारतात आलेल्या सहा प्रवांशांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद शहरातील प्रयोगशाळेत सहा जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारी अलगीकरण गृहात सहा रुग्णांवर निगराणी -

बंगळुरुमधील NIMHANS या प्रयोगशाळेत तीन नमुने, हैदराबादमधील सेंटर फॉर सेल्युलस अ‌ॅन्ड मॉलॅक्युलर बायोलाजी प्रयोगशाळेत दोन नमुने आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेत तपाणीसाठी पाठवलेला एक नमुन्यात नव्या कोरोनाचे विषाणू सापडले आहेत. या सर्व सहा रुग्णांना सरकारी आरोग्य सुविधेत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच संपर्कात आलेल्या आणखी व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. ब्रिटनहून येताना विमानातील सहप्रवाशांचाही शोध घेण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य सरकारांना मार्गदर्शन -

परिस्थितीची काळजीपूर्वक पाहणी करण्यात येत असून राज्य सरकारांना योग्य तो सल्ला वेळोवेळी देत आहोत. निगराणी, कंन्टेन्मेंट झोन, कोविड नमुन्यांची चाचणीसाठी राज्य सरकारांना आम्ही मदत करत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. नोव्हेंबर २५ ते डिसेंबर २३ दरम्यान भारतातील विविध विमानतळांवर ब्रिटनमधून सुमारे ३३ प्रवासी आले. आत्तापर्यंत त्यातील ११४ कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. या सर्वांचे नमुने भारतातील विविध प्रयोगशाळांत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या सर्व नमुन्यांचे 'जिनोम सिक्वेंसिग' करण्यात येत आहे.

नॅशनल टास्क फोर्सची बैठक -

नव्या कोरोना विषाणूचा धोका पाहता भारत सरकारच्या 'नॅशनल टास्क फोर्स' समितीने २६ डिसेंबरला बैठक घेतली. या बैठकीत कोरोनावरील उपचार, चाचणी, निगराणी आणि कन्टेन्मेंट रणनितीवर पुन्हा चर्चा करण्यात आली. भारतात नव्या विषाणूचे सहा रुग्ण सापडल्याने पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. या विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी सरकारने 'स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल'ही जारी केला आहे.

Last Updated : Dec 29, 2020, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.