हैदराबाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील मुनुगोडे भागात एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत Amit Shah To Address Public Meeting. काँग्रेस आमदार के. राजगोपाल रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. एक दिवस आधी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी मुनुगोडे येथे जाहीर सभेला संबोधित केले. पोटनिवडणुकीसाठी राव यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीची तयारीही जोरात सुरू आहे.
अमित शाह यांच्या उपस्थितीत राजगोपाल रेड्डी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे तेलंगणचे प्रभारी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. चुग म्हणाले, भाजपने संकल्प केला आहे की, फसवणूक झालेल्या तेलंगणातील लोकांच्या पाठीशी पक्ष उभा राहील. टीआरएसच्या 8 वर्षांच्या कुशासनामुळे लोक संतप्त आहेत. भाजपने घराणेशाही आणि कुशासन उघड करण्याचा संकल्प केला आहे.