ETV Bharat / state

Woman dies after falling off Mumbai local train

A woman died after falling off a local train in Thane on Monday. She was rushed to a nearby hospital where she succumbed to her injuries.

Woman dies after falling off Mumbai local train
Woman dies after falling off Mumbai local train
author img

By

Published : Dec 16, 2019, 6:00 PM IST

Updated : Dec 16, 2019, 7:12 PM IST

Thane: A 22-year-old woman from Dombivali in Maharashtra's Thane district on Monday fell from a suburban train and died after being rushed to a nearby hospital with severe injuries, police said.

The incident happened between kilometres 47/17 and 47/15 on Central Railway's suburban network in the morning, said Inspector Satish Pawar of Dombivali railway police.

"Charmi Prasad, a resident of Bhopar in Dombivali, fell down from a train and was rushed to a hospital in Shastri Nagar where she succumbed to severe injuries. We have registered an accidental death case," Pawar added.

Read:| Savarkar row: Maha opposition seeks Rahul's apology

Thane: A 22-year-old woman from Dombivali in Maharashtra's Thane district on Monday fell from a suburban train and died after being rushed to a nearby hospital with severe injuries, police said.

The incident happened between kilometres 47/17 and 47/15 on Central Railway's suburban network in the morning, said Inspector Satish Pawar of Dombivali railway police.

"Charmi Prasad, a resident of Bhopar in Dombivali, fell down from a train and was rushed to a hospital in Shastri Nagar where she succumbed to severe injuries. We have registered an accidental death case," Pawar added.

Read:| Savarkar row: Maha opposition seeks Rahul's apology

Intro:kit 319Body:लोकलच्या गर्दीने आणखी एका २२ वर्षीय तरुणीचा घेतला बळी; रेल्वे मृत्यूंचे दुष्टचक्र थांबणार कधी ?

ठाणे : डोंबिवलीतील भावेश नकाते, धनश्री गोडवे, रजनीश सिंग आणि आता विपेंद्र यादव या रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूमध्ये एकच सारखेपणा असा की त्यांचा मृत्यू हा लोकलमधील जीवघेण्या गर्दीमुळे झाला. आज पुन्हा लोकलच्या गर्दीमुळे तरुणीला आपला जीव गमावला लागला. चार्मी पसाद (२२) असे धावत्या लोकल मधून पडून मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
चार्मी हिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होऊन काही दिवस त्याबद्दल चर्चा होईल , पण असे असंख्य चार्मी , भावेश, धनश्री, रजनीश आणि विपेंद्र आहेत ज्यांच्या मृत्यूची चर्चा होणे आवश्यक आहे. कारण असे अपघाती मृत्यू रोजचेच झाले आहेत. एकीकडे देश बुलेट ट्रेनची स्वप्न बघत असताना हा वेगवान प्रवास जर सुरक्षितच नसेल तर त्याला कितपत अर्थ राहील ? आणि हे दुष्टचक्र थांबणार कधी ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मृत चार्मी हि डोंबिवलीतील देसले पाडा परिसरात राहणारी होती. ती मुबंईतील एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होती. आज सकाळच्या सुमाराला रोजच्या प्रमाणे नोकरीवर जाण्यासाठी तिने डोंबिवली रेल्वे स्थानकातून ८ वाजून ५३ मिनिटाची मुंबईकडे जाणारी लोकल पडकली. मात्र डब्यात आदीच गर्दी असल्याने डोंबिवली - कोपर रोड दरम्यान गर्दीचा रेटा अधिकच वाढला आणि ती धावत्या लोकल मधून खाली पडून गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तिला उपचारासाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. मात्र येथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

सन 2013 पासून कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील रेल्वेमृत्यूंचा आकडा आहे 2 हजार 998 इतका आहे. म्हणजे जवळपास 3 हजार निष्पाप जिवांना या भागात रेल्वे दुर्घटनांमध्ये जीव गमवावा लागला आहे. (यामध्ये डोंबिवली व ठाणे पोलिसांच्या हद्दीतील मृत्यूंचा समावेश नाही) आश्चर्य म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून मुंबई विभागात याच रेल्वे पोलिसांच्या हद्दीत सातत्याने सर्वाधिक मृत्यू होत असताना सुरक्षेच्या उपाययोजनांच्या पातळीवर मात्र निराशाच पदरी पडते. कोणालाही कामकाजाचे ठिकाण घरापासून जवळ असेल तर तशी सोय हवीच असते. परंतु, हाताला काम मिळण्याच्या संधी आहेत मुंबईत. तेथील घरांचे भाव सर्वसामान्यांना परवडण्याच्या केव्हाच आवाक्याबाहेर गेले. त्यामुळे नाईलाजाने का होईना, ठाणे, डोंबिवली, कल्याण व आता त्यापलिकडे वस्ती मोठ्या वेगाने वाढत गेली. अंदाजे दशकभराआधी कल्याण स्थानक गेल्यावर पुढे लोकल अगदी रिकाम्या धावायच्या. पण आता कर्जत किंवा थेट कसारापर्यंत पीक अवर्समध्ये लोकल भरलेल्या असतात किंवा मुंबईकडे जातांना त्या तेथूनच भरून येतात. ही गर्दीच वाढत्या अपघातांना कारणीभूत ठरते. कल्याणच्या पलिकडे उपनगरीसेवेसाठी अवघे दोन मार्ग आहेत. त्यांच्यात वाढ करण्याची गरज किमान दोन दशके आधी होती. पण या कामाला आता प्रारंभ झाला आहे. कल्याण ते बदलापूरपर्यंत आणि आसनगांवपर्यंत चौथी मार्गिका टाकण्याच्या कामाला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात स्थान मिळाले. तरी ते प्रत्यक्षात येण्यासाठी किमान 3 ते 4 वर्षांचा अवधी लागेल. परंतु त्या दरम्यान लोकल प्रवाशांची संख्या वाढण्याचे थांबणार आहे का ? मुंबई परवडत नाही म्हणून अगदी कर्जत, खोपोली आणि कसारासारख्या टोकाला घर घेणाऱ्या या हजारो प्रवाशांना वाहतुकीचे आणखी काहीही साधन नाही. रेल्वेमार्गांना समांतर रस्ते बांधण्याची केवळ इतकी वर्ष चर्चाच राहिली.
रेल्वे प्रवास सुरक्षित करायचा असेल तर सर्वात आधी स्वयंचलित दरवाजांची आवश्यकता आहे. ते सध्या शक्य नाही. लोकलच्या दरवाजांमध्ये असंख्य प्रवासी लोंबकळत असताना ते बंद होऊ शकणार नाहीत. तंत्रज्ञानाचा आधार घेत यावर काही तोडगा काढता येऊ शकतो का, याची चाचपणी व्हायला हवी. प्रत्येक वेळी रेल्वे प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असले तरी काहीवेळा रेल्वे दुर्घटनांसाठी प्रवासीही जबाबदार असतात. फुटओव्हर ब्रीज असतील तिथे त्यांचा वापर करण्याचे सोडून रेल्वेचे रुळ ओलांडण्याचा आततायीपणा जिवावर बेततो. तरीही तीच चूक प्रवासी करत असतील तर त्यांना रोखायचे कसे ? याशिवाय लोकलच्या टपावरून प्रवास करणाऱ्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसून त्यांचा कोळसा झाल्याची उदाहरणे आहेत. त्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाहीत. मुंब्य्रासारख्या स्थानकावर असे प्रकार रोखण्यासाठी पोलिस नेमावे लागतात, ही प्रवाशांच्या दृष्टीनेही लाजीरवाणी बाब आहे.
कुर्ला ते कल्याणदरम्यान पाचवा व सहावा मार्ग टाकण्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. जेमतेम 35 किलोमीटरच्या मार्गाला दहा वर्षे लागतात यावरून कामाची गती समजून येते. मात्र हा मार्ग वाढला की लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे सध्याच्या अपघातांच्या संख्येत कमालीची घट होईल, अशी अपेक्षादेखील. पण दिवा ते कल्याण दरम्यानचे काम आजही सुरूच असून ते आता पुढीलवर्षी डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे म्हणणे आहे. ही डेडलाइन आधी मार्च महिन्यापर्यंत होती. ती कशामुळे वाढवण्यात आली याचा जाबदेखील ठाणे व कल्याण पट्ट्यातील खासदारांनी विचारलेला नाही. केवळ जाब विचारण्याऐवजी हे काम ठराविक मुदतीत करून घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील मृत्यू सन 2013 – 815, सन 2014 - 850 सन 2015 – 467, सन 2016 - 409 जानेवारी 2018 ते मे 2019 पर्यंत 279 प्रवासी धावत्या लोकल मधून पडून मृत्यूमुखी पडले आहेत.

Conclusion:dombiwali
Last Updated : Dec 16, 2019, 7:12 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.