कोकणातील प्रकल्पांना उद्धव ठाकरेंचा विरोध का? नारायण राणेंचा गंभीर आरोप - Narayan Rane
Published : Apr 14, 2024, 10:31 PM IST
मुंबई Narayan Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) कोकणातील प्रकल्पांना होणारा विरोध हा कोकणच्या प्रेमापोटी नाही तर तोडपाणी करण्यासाठी आहे, असा आरोप नारायण राणेंनी (Narayan Rane) केलाय. तर मी अशावेळी पक्षहीत, महायुतीच हीत बघतो. कुणाची पर्वा करत नाही. "वैयक्तिक स्वार्थापोटी कुणी अपशकुन करू नये". त्यासाठी मी तडजोड करणार नाही, पर्वा करणार नाही. कालच मी ऐकलं आणि आज आलो असं विधान नारायण राणे यांनी राजन तेलींच्या 'हट्टापायी' स्टेटसवर केलंय. दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. यावेळी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) उपस्थित होते.
हा केसरकर यांचा मोठेपणा : मी सांगितलेल्या कामाला दीपक केसरकर कधी नाही म्हणत नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे, निवडणूक आहे म्हणून हे मी सांगत नाही. तर उद्धव ठाकरेंकडून कोकणातील प्रकल्पांना होणारा विरोध हा कोकणच्या प्रेमापोटी नाही तर तोडपाणी करण्यासाठी आहे असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.