हैदराबाद :भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या अनेक कारला ग्राहकांनी पसंती दिलीय. त्यामुळं कंपनी भारतीय बाजारपेठेत नवनवी कार आणत असते. अशातच कंपनीनं कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन जनरेशन मारुती सुझुकी डिझायर 2024 लॉन्च केली आहे. या वाहनात कोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत? कारचं इंजिन कसं आहे. कार कोणत्या किंमतीला लॉन्च केलीय? जाणून घेऊया या बातमीतून.
नवीन जनरेशन मारुती डिझायर 2024 लाँच :मारुती सुझुकीनं कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन जनरेशन मारुती डिझायर 2024 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. यामध्ये कंपनीनं अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. तसंच तिसऱ्या पिढीच्या डिझाईनच्या तुलनेत नवीन पिढीला अतिशय नवीन लूक देण्यात आला आहे.
कोणते आहेत फिचर? :मारुती डिझायरमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यात नऊ इंची इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, 16 इंच अलॉय व्हील, एलईडी डीआरएल, एलईडी लाइट्स, एलईडी फॉग लॅम्प, बॉडी कलर बंपर, हाय माऊंट एलईडी स्टॉप लॅम्प, शार्क फिन अँटेना, फ्रंट फूटवेल इल्युमिनेशन, लेदर रॅप्ड स्टीयरिंग आहे. व्हील्स, ड्युअल टोन इंटिरियर्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, टीपीएमएस, सनरूफ, क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जर, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, ऑटो हेडलॅम्प, रिअर एसी व्हेंट, डिजिटल एसी पॅनल, सुझुकी कनेक्ट यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यात दोन ॲक्सेसरीज पॅकेजही दिले आहेत.