पुणे Youth Shot Dead In In Pune : पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस डोकं वर काढत आहे. त्यातच गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी नवी सांगवी परिसरात गोळ्या झाडून एका 30 वर्षीय तरुणाची हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या घटनेनं परिसरात दहशत पसरली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना केली आहेत. दीपक कदम असं त्या तरुणाचं नाव असून तो कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे.
मारेकऱ्यांनी भररस्त्यात केला गोळीबार :याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी या गजबजलेल्या परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ सुरू असते. या ठिकाणी दीपक हा तरुण उभा होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या तोंडावर पिस्तुलातून फायरींग केली. अचानक फायारिंग झाल्यानं त्याला पळायला देखील संधी मिळाली नाही. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करण्याचं काम सुरू केलं. पोलिसांकडून पुढील तपास करण्याचं काम सुरू आहे.