मुंबई-आज राज्यासह देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर येथे पारंपरिक पद्धतीने अनेक वर्षांपासून महाशिवरात्री उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातोय. राज्यभरातून भाविक नाशिक येथील त्रंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवात सहभागी होतात. दरम्यान, या ठिकाणी प्रत्येक वर्षी 'शिवार्पणस्तु' हा भरतनाट्यमच्या नृत्याचा कार्यक्रम सादर केला जातो. यावर्षी अभिनेत्री प्राजक्ता माळीला या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पण त्र्यंबकेश्वर हे पवित्र ठिकाण आहे आणि इथे कुठल्याही सेलिब्रिटीचे नृत्य केले जाऊ नये, असा विरोधही या कार्यक्रमावरून झाला होता. मात्र या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार नसल्याचं प्राजक्ता माळीनं म्हटलंय.
निर्णय का घेतला? :नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी 'शिवार्पणस्तु' भरतनाट्यम या नृत्याचे सादरीकरण होणार होते. हे सादरीकरण प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार करणार होते. मात्र मंदिर परिसर आणि तिथल्या जागेचा विचार करता, आपण गेलो तर तिथे मोठ्या प्रमाणात प्रशासनावर ताण येऊ शकतो. पोलीस आणि प्रशासन यांच्यावरती ताण येऊ शकतो. त्यामुळे या पवित्र दिवशी कोणतीही गडबड होऊ नये किंवा आपल्यामुळे कोणावरही ताण येऊ नये म्हणून आपण या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याचे प्राजक्ता माळीनं म्हटलंय. मी माझ्या कुटुंबाशी चर्चा केल्यानंतरच तिकडे अनुपस्थित राहण्याचा सर्वस्वी निर्णय माझा आहे आणि जरी मी तिकडे जाणार नसलो तरी माझे सहकलाकार नृत्याचे सादरीकरण करतील, असे प्राजक्ता माळीने व्हिडीओ जारी करत सांगितले.
....म्हणून मी 'शिवार्पणस्तु' कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला, प्राजक्ता माळीनं सांगितलं 'कारण' - PRJAKATA MALI ON MAHASHIVRATRI SHOW
त्र्यंबकेश्वर हे पवित्र ठिकाण आहे आणि इथे कुठल्याही सेलिब्रिटीचे नृत्य केले जाऊ नये, असा विरोधही कार्यक्रमावरून झाला होता. त्यामुळे कार्यक्रमाला जाणार नसल्याचं प्राजक्ता माळीनं म्हटलंय.

Published : Feb 27, 2025, 1:57 PM IST
जिथे भाव तिथे देव : मी तिकडे जाणार म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात अनावश्यक कार्यक्रमास प्रसिद्धी देण्यात आली होती. खरं तर या प्रसिद्धीची गरज नव्हती. मी इथे गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. प्रशासनावरती कोणताही ताण येऊ नये म्हणून आपण तिकडे अनुपस्थित राहणार आहे. अर्थात मी तिकडे जात नसल्यामुळे माझ्या आनंदावर विरजण पडणार आहे. परंतु वैयक्तिक सुखापेक्षा प्रशासनावर कुठलाही ताण येऊ नये, अशी माझी इच्छा आहे आणि शेवटी जिथे भाव असतो तिथे देव असतो. आणि मी कुठे बसूनही शिवाची आराधना केली तरी ती शिवापर्यंत पोहोचेल, असे प्राजक्ता माळीने व्हिडीओत म्हटलंय. प्राजक्ता माळीचे नृत्य सादर होऊ नये, इथे कोणत्याही सेलिब्रिटींना बोलावून नृत्याचा कार्यक्रम करू नये. त्यासाठीच प्राजक्ता माळीच्या नृत्याच्या कार्यक्रमाला देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदेंनी विरोध केला होता.
हेही वाचा :