महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसला मोठा धक्का; आमदार राजू पारवेंचा शिवसेनेत प्रवेश, रामटेक मतदारसंघातून उमेदवारी? - MLA Raju Parwe Joins Shivsena

MLA Raju Parwe Joins Shivsena : ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसलाय. राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Raju Parwe Resign
Raju Parwe Resign

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 8:53 PM IST

Updated : Mar 24, 2024, 9:12 PM IST

मुंबई/नागपूर MLA Raju Parwe Joins Shivsena :विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती दिलीय. राजू पारवे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. शिवसेनेच्या तिकिटावर रामटेक लोकसभा लढवणार असल्याचा दावा राजू पारवे यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.

आता महायुतीसोबत काम करणार : “मला या देशातील लोकप्रिय नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळं मी आता महायुतीसोबत काम करणार आहे. या सर्व नेत्यांचा मी खूप आभारी आहे,” असं राजू पारवे म्हणाले.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार :"सर्व नेत्यांच्या उपस्थितीत मी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. शेवटी आमच्या विभागाचासुद्धा विकास झाला पाहिजे. सात महिने बाकी असताना मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. मला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायचंय. सर्व नेत्यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेत प्रवेश केलाय. मी रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे," असा दावाही राजू पारवे यांनी केलाय.

अनेक नेत्यांनी सोडला काँग्रेसचा 'हात' : ऐन निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांनी पक्ष बदलण्यास सुरुवात केलीय. काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी 'हात' सोडून इतर पक्षात प्रवेश केलाय. बाबा सिद्दिकी, अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचि्ठ्ठी दिली. त्यात आता राजू पारवे यांचाही नंबर लागलाय.

हे वचालंत का :

  1. महादेव जानकरांचा 'रासप' महायुतीत सामील; जानकरांना कुठली एक जागा मिळणार? - Mahadev Jankar
  2. ठरलं! 'वंचित'चा स्वबळाचा नारा; प्रकाश आंबेडकर 'या' तारखेला भरणार अकोलामधून उमेदवारी अर्ज - Prakash Ambedkar
  3. विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळं राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडणार? शिवतारे म्हणाले, "बारामतीच्या जनतेचं..." - VIJAY SHIVTARE
Last Updated : Mar 24, 2024, 9:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details