महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कन्याकुमारी ते दिल्ली कारगिल विजय कलश यात्रेचं शिर्डीत आगमन; साई मंदिरात विजयी कलशाचं पूजन - Kargil Vijay Kalash Yatra

Kargil Vijay Kalash Yatra : कारगिल विजयी दिवसा निमित्तानं कारगिल विजय कलश यात्रेचं आज (25 जुलै) शिर्डीतील साई मंदिरात आगमन झालं. यावेळी साई समाधीवर कलश ठेवून त्याची विधीवत पूजा करण्यात आली. यासह यात्रेत सहभागी सर्व जवानांचा सत्कारही केला गेला.

Kargil Vijay Kalash Yatra
विजय कलश यात्रेचं शिर्डीत आगमन (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 11:02 PM IST

शिर्डी (अहमदनगर)Kargil Vijay Kalash Yatra : कारगिल विजयी दिवसा निमित्तानं बेंगळुरु येथील सिटीजन सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्यावतीनं काढण्यात आलेली कलश यात्रा आज (25 जुलै) शिर्डीत दाखल झाली. यावेळी कारगिल युद्धात सहभाग असलेल्या जवानांनी आपल्याकडील विजयी कलश साईबाबांच्या समाधीवर ठेवून कलशाची पूजा केली आणि साई समाधीचं दर्शन घेतलं.

कारगिल विजय कलश यात्रा शिर्डीत साईंच्या चरणी लिन (Etv Bharat Reporter)

यात्रेचा पहिला पडाव शिर्डीत :कारगिल विजय दिवसा निमित्तानं 17 जुलै रोजी कन्याकुमारी येथून या कारगिल विजयी कलश ​रथयात्रेची सुरुवात होते. गेल्या 24 वर्षांपासून ही यात्रा काढली जातेय. कन्याकुमारीहून निघाल्यानंतर या यात्रेचा पहिला पडाव हा शिर्डीत पडतो. या ठिकाणी कारगिलमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांंचा स्मृती कलश साई मंदिरात नेत साई समाधी जवळ ठेवत त्याचं विधीवत पूजनही केलं जातं. या यात्रेत कारगिलमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत कारगिल युद्ध ​लढलेले अधिकारी आणि जवान असतात.

कन्याकुमारी ते दिल्ली यात्रा :1999 साली पाकिस्तानने कारगिलवर कब्जा केल्यानंतर त्यावेळी झालेल्या युध्दात कठीण परिस्थिती असतानाही भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैनिकांना माघारी पाठवलं होतं. दरवर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. त्यासाठी दरवर्षी कन्याकुमारीहून मेजर भंडारी यांच्या नेत्रुत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली अशी यात्रा काढली जाते. शिर्डीत पोहोचलेल्या या यात्रेतील जवानांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या खिशाला देशाची शान असेला तिरंगा लावण्यात आलाय.

साई संस्थानकडून जवानांचा सत्कार :साईबाबा संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या सर्व जवानांचा साईंची शॉल, साईबाबांची उदी देऊन सत्कार केलाय. त्यानंतर ही कारगिल विजयी कलश रथयात्रा विजय दिवस साजरा करण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाली आहे.

हेही वाचा:

  1. "सर, हमे राशन नही, गोला बारुद ज्यादा दो!" कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा - Kargil Vijay Diwas
  2. कारगिल विजयाची 25 वर्षे: पंतप्रधान मोदी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला भेट देणार - Kargil Vijay Diwas
  3. कारगिल युद्धाला कारणीभूत ठरलेल्या घुसखोरीबाबत प्रथमच पाकिस्तानकडून चूक मान्य, नवाज शरीफ यांची पश्चातबुद्धी - Nawaz Sharif

ABOUT THE AUTHOR

...view details