पुणेHelicopter crashes in bavdhan- पुण्यातील बावधान परिसरात खासगी हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई आणि परमजीत सिंग अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत.
पुणे शहराच्या परिसरात धुके आहे. या धोक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हेलिकॉप्टर कोसळले. 2 वैमानिकासह एका इंजिनियरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातील बावधन भागात हेलिकॉप्टर कोसळले. हे हेलिकॉप्टर कोणाचे होते, हे अद्याप समजू शकलेले नाही. कारण ते आगीत जळाले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, कन्हैया थोरात
पुण्यातील बावधन येथील के के कन्स्ट्रक्शन टेकडी येथे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर घटनास्थळी पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाचे 4 वाहने पोहोचली आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहआयुक्त शशिकांत महावरकर म्हणाले, " सकाळी साडेसात वाजता या हेलिकॉप्टरनं टेकऑफ केलं होतं. लगेच पाच मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलिसांकडून केलं जात आहे."
- ऑगस्टा 109 असे दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे नाव आहे. हेलिकॉप्टरध्ये असलेल्या वैमानिकांची ओळख पटली आहे. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. तर मृत अभियंत्याचे नाव प्रीतम भारद्वाज आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी दिली.
याच हेलिकॉप्टर खासदार सुनील तटकरे करणार होते प्रवास-हेलिकॉप्टर हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, त्यापूर्वीच अपघात घडला. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे खासदार सुनील तटकरे हे सोमवारी या हेलिकॉप्टरनं पुण्याहून परळीला गेले होते. तेथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून सुनील तटकरे हे मुंबईला आले होते. आज सुनील तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरनं रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी याच ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले आहे.