जोहान्सबर्ग SA vs PAK 3rd T20I Live Streaming : दक्षिण अफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज 14 डिसेंबर (शनिवार) रोजी जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाईल. दक्षिण अफ्रिकेनं दुसऱ्या T20 सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता हा सामना जिंकत पाकिस्तानला 'क्लीन स्वीप' करण्याचा प्रयत्न असेल.
दुसऱ्या T20 सामन्यात काय झालं : दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि सॅम अय्युबच्या शानदार खेळीमुळं 206/5 अशी भक्कम धावसंख्या उभारली. सॅमनं 57 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 98 धावा केल्या. त्याच्याशिवाय इरफान खाननं 16 चेंडूत 30 धावा जोडल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून दयान घालिअम आणि ओटनीएल बार्टमन यांनी 2-2 बळी घेतले. 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रीझा हेंड्रिक्सनं 117 धावांची स्फोटक खेळी केली. रॅसी व्हॅन डर ड्युसेन (66*) सोबतच्या त्याच्या भागीदारीनं दक्षिण आफ्रिकेला 19.3 षटकांत विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिका क्लीन स्वीप करणार :दक्षिण अफ्रिकेनं पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत एकदाही तीन किंवा त्यापेक्षा अधिक T20 सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला क्लीन स्वीप केलेलं नाही. तसंच याआधी त्यांनी 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची T20 मालिका 2-1 नं जिंकली होती. यानंतर झालेल्या दोन मालिकेत पाकिस्ताननं विजय मिळवला आहे. त्यामुळं आजचा सामना जिंकत यजमान अफ्रिकन संघाला प्रथमच पाकिस्तानला तीन सामन्यांच्या T20 मालिकेत क्लीन स्वीप करण्याची संधी आहे.
मालिका | मालिकेतील सामने | जिंकले | हरले | मालिकेचा विजेता |
दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20 सामना 2006/07 | 1 | 1 | 0 | दक्षिण अफ्रिका |
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका T20I मालिका (UAE मध्ये), 2010/11 | 2 | 2 | 0 | दक्षिण अफ्रिका |
दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20I मालिका, 2012/13 | 1 | 0 | 1 | पाकिस्तान |
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका T20I मालिका (UAE मध्ये), 2013/14 | 2 | 2 | 0 | दक्षिण अफ्रिका |
दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20I मालिका, 2013/14 | 2 | 1 | 1 | ड्रॉ |
दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20I मालिका, 2018/19 | 3 | 2 | 1 | दक्षिण अफ्रिका |
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका T20I मालिका, 2020/21 | 3 | 1 | 2 | पाकिस्तान |
दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20I मालिका, 2021 | 4 | 1 | 3 | पाकिस्तान |
दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20I मालिका, 2024/25* | 2 | 2 | 0 | दक्षिण अफ्रिका |
दोन्ही संघातील हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 24 आंतरराष्ट्रीय T20 सामने झाले आहेत. त्यापैकी पाकिस्ताननं 12 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण अफ्रिकेनं 12 सामने जिंकले आहेत.
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 10 डिसेंबर, डरबन (दक्षिण आफ्रिका 11 धावांनी विजयी)
- दुसरा T20 सामना : 13 डिसेंबर, सेंच्युरीयन (दक्षिण आफ्रिका 7 विकेटनं विजयी)
- तिसरा T20 सामना : आज, जोहान्सबर्ग
दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा T20 कधी होणार?