कानपूर Ind vs Ban 2nd Test : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात 27 सप्टेंबर रोजी दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, ज्यात भारतीय संघ हा सामना जिंकून कसोटी मालिका जिंकू इच्छितो. एकीकडे सर्व चाहत्यांना विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा वर्षाव होताना पाहायचा आहे. दुसरीकडे, चाहत्यांना रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू कामगिरी पुन्हा पहायची आहे.
दोघांच्या पगारात मोठी तफावत :विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन हे सध्या भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू आहेत. या दोघांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट विक्रम केले आहेत. पण दोघांच्या पगारात मोठी तफावत आहे. विराट कोहलीचा BCCI च्या ग्रेड ए प्लस श्रेणीमध्ये समावेश आहे, तर रविचंद्रन अश्विनला ग्रेड ए यादीत ठेवण्यात आले आहे.
कोहली आणि अश्विनचा पगार किती : विराट कोहली ग्रेड ए प्लस श्रेणीमध्ये आहे, ज्यामध्ये त्याच्याशिवाय इतर तीन खेळाडू आहेत. ग्रेड ए प्लस श्रेणीतील खेळाडूचं वार्षिक वेतन 7 कोटी रुपये आहे. रविचंद्रन अश्विनशिवाय इतर पाच खेळाडू 'ए' श्रेणीत आहेत. ए श्रेणीतील खेळाडूंचं वार्षिक वेतन 5 कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत कोहली आणि अश्विनच्या पगारात 2 कोटींचा फरक आहे.