मेष (ARIES): आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशम भावात आहे. आजचा दिवस मित्र आणि सामाजिक कार्ये यांच्यासाठी धावपळ करण्यात जाईल. पैसा सुद्धा खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. मोठयांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात असलेल्या संततीची काही आनंददायी बातमी मिळेल किंवा भेट होईल. अचानक धन लाभ संभवतो.
वृषभ (TAURUS) :आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यापार-व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. कार्यालयात वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख शांती मिळेल. मित्र भेटीतून आनंद मिळेल.
मिथुन (GEMINI) :आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आपणास मानसिक व्यग्रता आणि शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचं सहकार्य मिळणार नाही. पैसा खर्च होईल. संततीबरोबर मतभेद होतील किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील. प्रतिस्पर्ध्यां पासून सावध राहावे लागेल.
कर्क (CANCER) :आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी आहे. आज प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात. वाणी आणि संतापावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य कटुता टाळू शकेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. अवैध कामांपासून शक्य तितकं दूर राहावं.
सिंह (LEO) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या स्थानी आहे. आज पति-पत्नीत मतभेद होऊन कटुता निर्माण होईल. दोघांपैकी एकाचं स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळं मन उदास राहील. सामाजिक क्षेत्रात अपयशी व्हाल. भागीदारांशी सुद्धा मतभेद होऊ शकतात. कोर्ट-कचेरीपासून शक्यतो दूरच राहा.
कन्या (VIRGO) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. आज कुटुंबात आनंद आणि उत्साहाचं वातावरण राहिल्यानं आपलं मन प्रसन्न राहील. स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील. व्यापार-व्यवसायात प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांचेकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. आईकडून चांगल्या बातम्या समजतील.
तूळ (LIBRA) :आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज आपण आपली कल्पनाशक्ती व सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा ह्यात भाग घेणं आपणास आवडेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. त्यांची प्रगती होईल. स्त्री मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रिय व्यक्तीच्या सहवासानं आनंद होईल. विचारांच्या आधिक्यानं मन विचलित होईल. सामान्यतः शारीरिक, मानसिक उत्साहाबरोबरच आज सर्व कामे कराल.